‘देवेंद्र फडणवीस सध्या ‘नावडाबाई’ झालेत…’, उद्धव ठाकरेंनी काढली खपली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Politics of Maharashtra: मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) 12 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी काल (19 जून) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी चौकशीसाठी SIT स्थापन केल्याची घोषणा केलाच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत फडणवीसांचा खरपूस समाचार घेतला. याचवेळी फडणवीसांच्या भाषणातील एका क्लिपवरुन बोलताना देखील देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. (shiv sena ubt udhhav thackeray corona vaccine video pm modi devendra fadnavis bjp leadership pm modi politics of maharashtra)

ADVERTISEMENT

”देवेंद्र फडणवीस सध्या ‘नावडाबाई’ झालेत…’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या जखमेवरची खपली काढल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण सत्ता बदलावेळी अचानक भाजपच्या नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंइत्री करण्याचे आदेश दिले. याच मुद्द्याला धरून फडणवीसांचा ‘नावडाबाई’ असा उल्लेख करत ठाकरेंनी त्यांना डिवचलं आहे.

‘फडणवीस म्हणतात.. मोदींनी कोरोनाची लस तयार केली’

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या कल्याणमधील भाषणाची एक क्लिप दाखवली होती. याच मुद्द्यावरुन पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरेंनी फडणवीसांना डिवचत म्हटलं की, ते आता दिल्लीश्वरांचे नावडाबाई झालेत.

हे वाचलं का?

‘हा एक जो काही भ्रम पसरवला जातोय.. आता काल ती मी एक क्लिप ऐकवली. देवेंद्र फडणवीस असं बोलतील असा मला विश्वास बसत नव्हता. आता ती पण कोणी मॉर्फ केली का… हे त्यांनी शोधावं.’

हे ही वाचा >> Pune : दर्शना पवारची हत्याच! दोघे राजगडावर गेले, पण राहुल एकटाच परतला

‘मोदीजींनी लस तयार केली नसती तर…? मोदीजींनी लस कधी तयार केली? मला नाहीत की.. मोदीजी स्वत: कधी असं बोलले असतील. त्यावरुन ते मला अर्धवटराव म्हणाले.’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

‘आता ती ‘नावडाबाई’ झाली आहे’

‘अर्धवटराव हे पहिलं पात्र कोणाचं? रामदास पाध्ये यांचं.. बोलका बाहुला. आता मला ‘अर्धवटराव’ म्हणत असतील तर हे काय दिल्लीश्वरांचे ‘आवडाबाई’ आहेत का? कारण त्यांची दोन पात्रं होती.. एक अर्धवटराव आणि दुसरं आवडाबाई.. पण आता ते पण दिसत नाही. आता ती ‘नावडाबाई’ झालेली आहे.’ असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांच्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवलं

ADVERTISEMENT

‘मोदीजींची लस तयार केली या वाक्याला आता काही अर्थ नाही. पूर्ण क्लिप ऐकवली नाही म्हणे.. पण ते वाक्य तर आहे ना.. ते नसते तर आपण कटोरा घेऊन बसलो असतो वैगरे.. कोणत्या जगात तुम्ही राहत आहात. लोकांना मूर्ख का समजता?’

हे ही वाचा >> UN : ‘शिंदेंची बंडखोरी, गद्दार दिवस’! संजय राऊतांचं आंतरराष्ट्रीय राजकारण

’17 कोटी लस.. विकत घेण्याची तयारी आपण दाखवली होती. एकरकमी चेक देतो.. आम्हाला पाहिजे तेवढ्या लस द्या. नाही दिल्या.. आम्ही कोठेही केंद्रावर दोषारोप केले नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT