Lok Sabha 2024 : ईशान्य मुंबईतून ठाकरेंचा उमेदवार ठरला! कोण आहेत संजय पाटील?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sanjay patil is candidate of shiv sena ubt for lok sabha 2024 election
Sanjay patil is candidate of shiv sena ubt for lok sabha 2024 election
social share
google news

Mumbai North East Lok Sabha Constituency Sanjay Patil : शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कंबर कसली आहे. उद्धव ठाकरेंनी पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रीत केलं असून, मुंबईत दुसरा उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून (Mumbai North East Lok Sabha Constituency) संजय राऊत यांच्या नावाची चर्चा होती, मात्र या मतदारसंघातून माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या नावाची घोषणा ठाकरेंच्या सेनेने केली आहे. शिवसेना (यूबीटी) सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली.

ADVERTISEMENT

लोकसभा 2024 निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईतही महायुती आणि महाविकास आघाडीने तयार सुरू केली असून, ठाकरेंनी दोन मतदारसंघातून उमेदवारही जाहीर केले आहेत. यापूर्वी ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे सुपूत्र अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर दुसरा उमेदवार जाहीर करण्यात आला.

ईशान्य मुंबईतून संजय पाटील मैदानात

भांडूपमध्ये 27 नोव्हेंबर रोजी ठाकरेंच्या शिवसेनेचा कोकणवासीयांचा मेळावा पार पडला. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले की, “ईशान्य मुंबईची जागा ही शिवसेना ठाकरे गट लढेल आणि माजी खासदार संजय पाटील हे असतील.” या मतदारसंघातून संजय राऊतांना उमेदवारी देणार अशी चर्चाही होती. पण, पाटलांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Prithviraj Chavan : “राष्ट्रवादीने सरकार पाडले नसते, तर मराठा आरक्षणाचा…”

कोण आहेत संजय दिना पाटील?

ईशान्य मुंबईतून ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केलेले संजय पाटील हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. 2004 मध्ये त्यांनी भांडुप विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकले. पुढे 2009 मध्ये शरद पवारांनी त्यांना ईशान्य मुबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं. या निवडणुकीत गुलाल उधळत ते लोकसभेत पोहोचले.

सलग दोन निवडणुकीत पराभव

2014 लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय पाटलांचा पराभव केला. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले, पण भाजप उमेदवाराने त्यांचा पराभव केला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Dharmveer 2 : ‘सिनेमा आवडो न आवडो आता…’,CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

भाजपचे मनोज कोटक यांनी ईशान्य मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने पराभव केला. मनोज कोटक यांना 5 लाख 14 हजार 599 मते मिळाली होती, तर संजय पाटील यांना 2 लाख 88 हजार मते 113 मते मिळाली होती. दरम्यान, संजय पाटील यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT