‘त्या’ भव्य-दिव्य सोहळ्याला एकनाथ शिंदेंना बोलवायला विसरले की डावललं? , राजकारणाच्या नव्या डावाने कोणाची विकेट?

मुंबई तक

महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमध्ये प्रोटोकॉलवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या एका कार्यक्रमाच्या निमंत्रणातून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याने हा वाद उफाळून आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

नवी मुंबईः महाराष्ट्रात महायुतीचे भक्कम सरकार सत्तेत आहे. तब्बल 232 आमदारांच्या पाठिंब्यावर उभे असलेले हे सरकार मोठ्या ताकदीने काम करत असल्याचे वेळोवेळी दिसून येते. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने विरोधकांची ताकद किती कमी झाली आहे, हे स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व काही सुरळीत असून सरकार पूर्णपणे स्थिर आहे, असे वाटत असतानाच एक नवी घटना समोर आली आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे मान-अपमानाचे राजकारण. या वादाची ठिणगी पडली ती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य 20 फूट उंच पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावरून.

शनिवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 परिसरात हा अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन अदानी समूहाच्या विमानतळ प्राधिकरणाने, सिडकोच्या सहभागाने केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रणच देण्यात आले नसल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर राजकीय चर्चांना सुरुवात झाली.

नेमकं काय घडलं?

हा केवळ प्रशासकीय गोंधळ होता की जाणूनबुजून केलेला राजकीय हस्तक्षेप? एकनाथ शिंदे यांना मुद्दाम डावलण्यात आले का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

हे वाचलं का?