‘स्वयंभूंच्या मागेच जनता, शेंदूर फासलेल्या…’ राऊतांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
शिवसेना (UBT) खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला हाणला.
ADVERTISEMENT
दिल्ली : स्वयंभू दैवतांच्याच मागे जनता जाते, शेंदूर फासलेल्या दगडांच्या मागे जात नाही, असं म्हणतं शिवसेना (UBT) खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला हाणला. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. बुधवारी (२६ एप्रिल) एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी मी उद्धव आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना काय सल्ला देणार, ते स्वयंभू नेते आहेत, असं म्हटलं होतं. यावर राऊत यांनी उत्तर दिलं. (Shivsena (UBT) Leader reply to MNS Leader Raj Thackeray on Uddhav Thacekray criticism)
ADVERTISEMENT
काय म्हणाले संजय राऊत?
होय आम्ही स्वयंभूच आहोत. स्वयंभू दैवतं असतात त्यांच्या मागेच जनता जाते. शेंदूर फासलेल्या दगडांच्या मागे जात नाही. कोणी दगडांना शेंदूर फासत आणि आता यांना नमस्कार करा म्हटलं तर लोक नमस्कार करत नाहीत. जे स्वयंभू असतात त्या स्वयंभू नेत्यांना आणि देवतांना श्रद्धेचा मान मिळतो आणि तो मान ठाकरे कुटुंबीयांना मिळतो. यावर जर कुणाला पोटदुखी होत असेल तर त्यांनी सांगावं आमच्याकडे उपचार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
मनसे कोणाला टाळी देणार? अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा बाऊन्सर
काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज ठाकरे यांची लोकमतम माध्यम समुहाकडून मुलाखत घेण्यात आली. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे यांची ही मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची नाव घेत त्यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय सल्ला द्याल? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी ‘जपून रहा’असा सल्ला दिला. देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी ‘वरती संबंध नीट ठेवा’ असा सल्ला दिला.
हे वाचलं का?
भावी मुख्यमंत्री ‘अजित पवार’ : महाराष्ट्रात लागलेल्या होर्डिंग्जचा अर्थ काय?
पुढे उद्धव ठाकरे यांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना काय सांगणार मी, स्वयंभू आहेत ते. तर आदित्य ठाकरे यांना काका म्हणून काय सल्ला द्याल असं विचारतात, तेच ते असं म्हणतं त्यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेही स्वंयभू नेते असल्याचं म्हटलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांना ‘बाहेर जेवढे लक्ष देता त्यापेक्षा जास्त काकांवर लक्ष ठेवा’, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT