Supriya Sule: 'भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि...', सुप्रिया सुळेंचं 'ते' विधान प्रचंड चर्चेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

supriya sule big statment dharashiv shiv swarajy yatra ajit pawar mistake sharad pawar maharashtra politics
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा बुधवारी धाराशीवमध्ये पोहोचली होती.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभेच्या इलेक्शननंतर बहीण लाडकी वाटायला लागली

point

देवेंद्रजी स्वत:च्या खिशातून देतायत का?

point

आमच्या टॅक्सचे पैसै या खिशातून त्या खिशात दिली जातायत

Supriya Sule News : धाराशीव :  ''बारामतीत बहीण सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीसाठी उभं करण ही चूक होती, तर घरात राजकारण आणायला नको होतं, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली होती. अजित पवारांच्या या विधानानंतर आता सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केले आहे. ''भावाने मागितलं असतं तर सगळं देऊन टाकलं असतं,भावाने मागून तरी बघायचं'' असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे यांच्या विधानानंतर पवार कुटुंबियांचं मनोमिलन होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (supriya sule big statment dharashiv shiv swarajy yatra ajit pawar mistake sharad pawar maharashtra politics) 

ADVERTISEMENT

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा बुधवारी धाराशीवमध्ये पोहोचली होती. यानिमित्त आयोजित सभेत सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केले आहे. ''भावाने मागितलं असतं तर सगळं देऊन टाकलं असतं, काय पक्ष आणि चिन्ह, काही मागितलं असतं तर दिलं असतं, काय आहे खाली हात आएंगे आणि खाली हात जाएंगे, गाठोड घेऊन आली आहे का, गाठोड घेऊन जाणार आहे?, भावाने मागून तरी बघायचं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

हे ही वाचा : Uddhav Thackeray : राहुल गांधीसमोर ठाकरे झुकले? व्हायरल फोटोमागचे सत्य आलं समोर

''लोकसभेच्या इलेक्शननंतर बहीण लाडकी वाटायला लागली. महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत. तुम्ही 1500 रुपये दिले म्हणून आम्ही नात्यात वाहत जाऊ. सत्तेतील आमदारांना वाटायला लागले आहे की, 1500 रुपये दिले की कोणताही अन्याय आमच्यावर करू शकता, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

हे वाचलं का?

महिलांचा स्वभाव या सरकारला कळालाच नाही. ते विकलेले आहेत ना म्हणून त्यांना सगळेच विकलेले वाटतात. हे काय स्वत:च्या खिशातून देतायत का भाऊबीज, काल देवेंद्र फडणवीस म्हणाले ओवाळून डायरेक्ट...कुणाला ओवाळून देताय, देवेंद्रजी स्वत:च्या खिशातून देतायत का? आम्ही टॅक्स भरतो, आमच्या टॅक्सचे पैसै या खिशातून त्या खिशात दिली जातायत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली. 

हे ही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana : अर्ज न भरलेल्यांसाठी गुड न्यूज! अदिती तटकरे म्हणाल्या, 'आता...'

दरम्यान विरोधात मतं दिली तर पैसे परत काढून घेऊ असे वक्तव्य रवी राणा यांनी केले होते. त्यावर आता सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, ''माझी विनंती आहे. तू एका बहिणीचे पैसे परत घेऊन दाखव. मी चॅलेंज करते की, तुम्ही पैसे घेऊन दाखवा. मग बघा मी काय करते. डिसेंबरमध्ये लाडकी बहीणच्या लिस्टची स्क्रूटीनी होणार हे कोणाला माहिती होते का हो? मला तर ते माहिती नव्हते. मग यांना कसे कळले'', असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT