Supriya Sule : ''बाबांपेक्षा बाळासाहेबांनीच माझ्या लग्नात...'', सुप्रिया सुळेंनी सांगितला किस्सा

मुंबई तक

ADVERTISEMENT

supriya sule on his marriage share emotional story sharad pawar cry  shiv sena pramukh  balasaheb thackeray
सुप्रिया सुळेंनी त्यांच्या लग्नाबाबतचा किस्सा सांगितला आहे,
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांचे लग्न जमवतानाचा किस्सा सांगितला.

point

सुप्रिया सुळेंच्या लग्नात शरद पवार भावूक झाले होते

point

माझे लग्न जमवण्यात बाबांचा रोल झिरो होता.

Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे खासदार कन्या सुप्रिया सुळेंच्या लग्नात भावूक झाले होते. पण सुप्रिया सुळेंचा लग्न जमवण्यात शरद पवारांचा (Sharad Pawar) फारसा हात नव्हता. यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मोलाची भूमिका बजावली होती. सुप्रिया सुळेंनी (Supriya sule) याबाबतचा आता संपूर्ण किस्सा सांगितला आहे.  (supriya sule on his marriage share emotional story sharad pawar cry  shiv sena pramukh  balasaheb thackeray) 

ADVERTISEMENT

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची एबीपी माझाच्या माझा महा कट्टावर  मुलाखत पार पडली आहे. या मुलाखतीत आता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या लग्न जमवण्यामागचा संपूर्ण प्रसंग सांगितला आहे. शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांचे लग्न जमवतानाचा किस्सा सांगितला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी माझे लग्न जमवण्यात बाबांपेक्षा म्हणजे शरद पवारांपेक्षा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मातोश्री प्रतिभा पवार यांचीच जास्त भूमिका होती असे सांगितले.

हे ही वाचा : Video : क्रॉस वोटींगच्या प्रश्नावर जितेश अंतापूरकरांनी काढला पळ, नांदेडमध्ये काय घडलं?

सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, माझे लग्न जमवण्यात बाबांचा रोल झिरो होता. माझी आई आणि बाळासाहेब ठाकरे यांचा रोल जास्त होता. शरद पवारांनीही मोठ्या मनाने ही गोष्ट मान्य केली.  शरद पवार म्हणाले की, वस्तुतः माझी भूमिका शून्यच होती. माझ्या जवळच्या मित्रांनी सदानंद सुळे यांचे स्थळ सुचवले होते. बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्योजक माधव आपटे असतील. माझ्या जावयाचे वडील व आपटे कदाचित एकमेकांचे चांगले मित्र होते. आमच्या मित्रांनी त्यांच्या मुलाचे स्थळ सूचवले. त्यानंतर सुप्रिया व सदानंद एकमेकांना भेटले. जवळचे लोक सूचवतील तोच माझा जावई होणार हे सूत्र माझे ठरले होते, असे ते म्हणाले.

हे वाचलं का?

सुप्रिया सुळे यांनी यावेळी शरद पवारांनी आपल्यावर केव्हाच हात उचलले नसल्याचे सांगितले आहे. मी वडिलांच्या हातून केव्हाच मार खाल्ला नाही. ते साधे ओरडलेही नाही. कारण, ते डिपार्टमेंट आईकडे होते. ती खूप मारायची. पण पाय मारल्याचे मला आठवत नाही. तिने हाताने व पट्टीने खूप मारले, असे त्या हसत म्हणाल्या आहेत. 

हे ही वाचा : Sharad Pawar : मराठा समाजाला 'ओबीसी'तून आरक्षण द्यायला हवं का? पवार म्हणाले...

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT