कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पूजा कोण करणार ? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘माझ्या मनात…’
सुप्रिया सुळे यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होत्या, यावेळी त्यांना कोणता उप मुख्यमंत्री पाडुरंगाची पूजा करणार आणि कोण साकड घालणार ? असा सवाल करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
Supriya Sule On Kartiki Ekadashi : यंदाच्या वर्षी कार्तिकी एकादशीला विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा कोण करणार ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) की उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) असा मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यात मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक नेत्यांना गावबंदी केली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पुजेलाही विरोध दर्शवलाय. अशात ही पूजा उपमुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार की नाही असाही प्रश्न आहे. यावर आता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावर उत्तर दिले आहे. त्या काय म्हणाल्या आहेत, ते,जाणून घेऊयात. (supriya sule reaction who will worship vitthal on kartiki ekadashi ajit pawar or devendra fadnavis)
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळे यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होत्या, यावेळी त्यांना कोणता उप मुख्यमंत्री पाडुरंगाची पूजा करणार आणि कोण साकड घालणार ? असा सवाल करण्यात आला होता. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते काय मला माहिती नाही. पण माझ्या मनात आणि ओठात रामकृष्ण हरी येतेय, मी रामकृष्ण हरीवाली आहे. त्यामुळे आपल्या सर्वाना माहितीय. आपण सगळे वारकरी कुटुंबातले शेतकरी माणस आहोत, त्यामुळे हरीमुखे म्हणा हरीमुखे म्हणा,असे सुप्रिया ताईंनी म्हटले आहे. एकूणच सुप्रिया ताईंनी या प्रश्नावर उत्तर देणे टाळले आहे.
हे ही वाचा : भयंकर! आईसह 3 मुलांचाही चिरला गळा, रक्ताच्या थारोळ्यात अख्ख्यं कुटुंब
तसेच येत्या कार्तिकी एकादशीला 23 नोव्हेंबर रोजी पंढरपूराला विठ्ठलाची महापूजा होणार आहे. या शासकीय पूजेला उपमुख्यमंत्र्यांनी येऊ नये, विठ्ठलाच्या पूजेचा मान सामान्य वारकऱ्याला देण्यात यावा, जर उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला आले तर त्यांना काळे फासण्यात येईल असाही इशारा पंढरपूरच्या सकल मराठा समाजाने दिला आहे.
हे वाचलं का?
मंदिर समितीने घेतला मोठा निर्णय
राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून अनेक ठिकाणी नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या पूजेला कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाच्या भावना शासनाला कळविण्यात येणार असून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीत उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा : Video : अफगाणिस्तानच्या खेळाडूने दाखवला मनाचा मोठेपणा, गरिबांची दिवाळी केली गोड
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT