Katipally Venkat Reddy : माजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना पाडलं, कोण आहे ‘हा’ भाजपचा ढाण्या वाघ?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

telangana bjp katipally venkat ramana reddey defeat k chandrashekhar rao and congress revanth reddy kamareddy seat telangana assembly election result
telangana bjp katipally venkat ramana reddey defeat k chandrashekhar rao and congress revanth reddy kamareddy seat telangana assembly election result
social share
google news

Katipally Venkat ramana reddy defeat k Chandrashekhar rao and congress revanth reddy  kamareddy seat : तेलंगणामध्ये आता काँग्रेसची सत्ता येणारे हे निश्चित झाले आहे. कारण काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठत 64 जागा जिंकल्या आहेत. असे असले तरी तेलंगणाच्या निवडणूकीत एका धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. या निवडणूकीत भाजपने फक्त 8 जागा जिंकल्या आहेत. या 8 जागा जिंकून देखील भाजपने काँग्रेस आणि बीआरएसला घाम फोडला आहे. यामागचे कारण ठरला भाजपचा उमेदवार कट्टीपल्ली वेंकटा रामा रेड्डी (Katipally Venkat ramana reddy). नेमकं भाजपच्या या पठ्ठयाने निवडणूकीत काय धुमाकुळ घातलाय हे जाणून घेऊयात. (telangana bjp katipally Venkat ramana reddy defeat k Chandrashekhar rao and congress revanth reddy kamareddy seat telangana assembly election result)

तेलंगणातील कामारेड्डी मतदार संघातून (kamareddy seat) बीआरएसचे मावळते मुख्यमंत्री के. चंद्रशेखऱ राव (k Chandrashekhar rao) , काँग्रेसचे रेवंथ रेड्डी (congress revanth reddy)आणि भाजपचे कट्टीपल्ली वेंकटा रामा रेड्डी निवडणूकीच्या रिंगणात होते. त्यामुळे कामारेड्डी मतदारसंघात तिरंगी लढत रंगली होती. या तिरंगी लढतीत धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे.

हे ही वाचा : Chahat Pandey : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेत्रीचं काय झालं?

कामारेड्डीमधून मतमोजणी सुरू झाल्यापासून काँग्रेसचे रेवंथ रेड्डी पहिल्या स्थानावर होते. तर दुसऱ्या स्थानी के. चंद्रशेखऱ राव आणि तिसऱ्या स्थानी भाजपचे कट्टीपल्ली वेंकटा रामा रेड्डी होते. मात्र दुपारी आलेल्या कलानंतर चित्र काहीसे बदललं. तिसऱ्या स्थानी असलेल्या कट्टीपल्ली वेंकटा रामा रेड्डी यांनी आघाडी घेत पहिल्या स्थानी मुसंडी मारली होती. त्यानंतर निकालाच्या शेवटच्या टप्प्यात अटीतटीची लढत झाली आणि भाजप उमेदवार कट्टीपल्ली वेंकटा रामा रेड्डी यांनी बाजी मारली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : सत्तेची मुजोरी! भाजप आमदाराने अधिकाऱ्यावर हात उगारला, नेमकं प्रकरण काय?

कामारेड्डी मतदार संघातून रेवंथ रेड्डी यांना 54 हजार 916 मते पडली आहेत आणि ते तिसऱ्या स्थानी ढकलले गेले आहे. आणि बीआरएचे प्रमुख आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव तिसऱ्या स्थानी आहेत. चंद्रशेखर राव यांना 59 हजार 911 मते पडली आहेत. तर भाजप उमेदवार कट्टीपल्ली वेंकटा रामा रेड्डी यांना 66 हजार 652 मते पडली आहेत. अवघ्या 6 हजार 741 मतांनी त्यांनी हा विजय मिळवला आहे. विशेष म्हणते कट्टीपल्ली वेंकटा रामा रेड्डी यांनी एकाच निवडणूकीत माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि काँग्रेसचे भावी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचा पराभव केला आहे. त्यामुळे भाजपच्या या विजयाची तेलंगणात चर्चा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT