संतोष देशमुखांच्या हत्येला दोन महिने पूर्ण, आतापर्यंत उत्तर न मिळालेले प्रश्न कोणते?

निलेश झालटे

Santosh Deshmukh Case Updates: संतोष देशमुखांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही काही प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. जाणून घेऊया त्याचविषयी सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
संतोष देशमुखांच्या हत्येला दोन महिने पूर्ण
social share
google news

Santosh Deshmukh News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 2 महिने झाले आहेत. हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी पथकं तपास करतायेत. मात्र हत्येतील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. 

एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. या प्रकरणात देशमुख कुटुंब लढा देत आहेच. मात्र खऱ्या अर्थाने प्रकरण उचलून धरलं ते सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी. अनेक आरोप केले गेले, यात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरु लागली.

हे ही वाचा>> 'पेनड्राईव्ह दिल्यापासून 500 लोक कोमात गेलेत..', सुरेश धसांच्या 'त्या' पेनड्राईव्हमध्ये आहे तरी काय?

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम

  • 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून छळ करून हत्या केली
  • 10 डिसेंबरला जयराम चाटे आणि महेश केदार या 2 आरोपींना अटक करण्यात आली
  • 11 डिसेंबरला तिसरा आरोपी प्रतिक घुलेला रांजणगावमधून अटक करण्यात आली
  • 11 डिसेंबरला आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेवर गुन्हा दाखल करण्यात आला
  • 13 डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली
  • 14 डिसेंबर 2024ला केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं
  • 14 डिसेंबरला देशमुख हत्या प्रकरणाचे विधीमंडळात पडसाद उमटले
  • 18 डिसेंबरला आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात आली
  • 21 डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानं पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली
  • 21 डिसेंबरला नवनीत कॉवत यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली
  • 24 डिसेंबरला आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला
  • 30 डिसेंबरला वाल्मिक कराडच्या अटकेसाठी आंदोलन केली गेली
  • 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला
  • 4 जानेवारी 2025ला आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली
  • 11 जानेवारीला देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यात आला

हे ही वाचा>> Dhananjay Deshmukh: "त्यांच्यावर किती गंभीर गुन्हे आहेत, ते आम्ही...", धनंजय देशमुख नामदेव शास्त्रींबद्दल नेमकं काय म्हणाले?

अनेक प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत...

-अखेरचा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार का?
-विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही का सापडलेला नाही?
-वाल्मीक कराडला स्पेशल ट्रिटमेंट का दिली जातेय?
-आधी कराड आणि मग आता सुदर्शन घुले मुख्य आरोपी
-हत्येचा मास्टरमाईंड वेळोवेळी का बदलला जातोय?
-तपास कुठवर आला, याची सविस्तर माहिती नाहीच
-तपासाची माहिती देणं बीड पोलीस का टाळताहेत?
आरोपी कृष्णा आंधाळेला अद्याप पर्यंत सीआयडी किंवा एसआयटी का पकडू शकली नाही.
-केवळ विनंती म्हणून विष्णू चाटेला लातूर जेल का दिलं गेलं?
-सीआयडी, एसआयटीकडे तपास आम्ही काय माहिती द्यायची?- विश्वसनीय सूत्रांकडून माहिती
-गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बीडला भेटीला गेले नाहीत? मात्र कुटुंबीय मुंबईत भेटायला आले...
-धनंजय आणि पंकजा दोन्ही भेटायला गेले नाहीत, पंकजा फोनवर बोलल्या अशी माहिती समोर आलेली.

हे वाचलं का?

    follow whatsapp