'पेनड्राईव्ह दिल्यापासून 500 लोक कोमात गेलेत..', सुरेश धसांच्या 'त्या' पेनड्राईव्हमध्ये आहे तरी काय?
Suresh Dhas Pendrive: बीडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली. ज्यानंतर मीडियाशी बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी एक मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठकीत काय घडलं?
सुरेश धस आणि धनंजय मुंडे बैठकीत नेमकं काय बोलले
सुरेश यांनी अजित पवारांसमोर केले काही गंभीर आरोप
बीड: 'बोगस कामांचे 78 कोटी रुपये हे उचलण्यात आले आणि त्यात काही पैसे हे DPDC चे आहेत. त्यासंबंधी मी एक पेनड्राईव्ह हा काल (29 जानेवारी) अजितदादांच्या पीएना दिला आहे. मी काल स्टेटमेंट केल्यापासून जवळजवळ 500 लोकं कोमात गेले आहेत.' असं विधान करत भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळ उडवून दिली आहे.
पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (30 जानेवारी) बीडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. ज्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार आणि खासदार होते. विशेष बाब म्हणजे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे हेही या बैठकीत उपस्थित होते.
हे ही वाचा>> Raj Thackeray : "अजित पवार ते हेमंत बिस्वा शर्मा... भाजपने ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच मंत्री केलं"
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत काही विषयांवरून वाद झाल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी एक मोठं विधान केलं आहे. पाहा पत्रकार परिषदेत ते नेमकं काय म्हणाले.
'तेव्हापासून 500 लोकं कोमात गेलेत...', सुरेश धसांना कोणाला हाणला टोला?
'आष्टीमध्ये जनावरांच्या बाबतीतील एक्स रे मशीन आणि पोट तपासायचं मशीन याला 50 लाख रुपये द्यायचा निर्णय झाला. बाक जे काही बोगस कामांचे बिलं उचलली होती त्याबाबतीत मुद्दा उपस्थित केल्यावर अजितदादांनी सांगितलं की, लेखी पत्र द्या. मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहेत. परंतु या जिल्ह्यात 73 कोटी बोगस उचलल्याचं मी जाहीर केलं आहे.'










