Deepak Kesarkar : “मविआ सोडणार, भाजपसोबत सरकार… उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलं होतं वचन”
Mla Disqualification Deepak kesarkar : उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जून २०२१ मध्ये भेट झाली होती. त्या भेटीत काय ठरलं होतं, याबद्दल दीपक केसरकर यांनी खुलासा केला.
ADVERTISEMENT
MLA Disqualification Latest News : ‘जून 2021 मध्ये नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करणार असे वचन उद्धव ठाकरेंनी मोदींना दिले होते’, असा दुसरा गौप्यस्फोट शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी सुरू असताना शिंदेंच्या आमदाराने केला. उदय सामंत यांच्यानंतर दीपक केसरकर यांची उलटतपासणी झाली. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना युती घडवण्यासाठी पडद्यामागे घडलेल्या घटना सुनावणीत समोर आणल्या. (Uddhav Thackeray had committed to PM Modi that Dissolving MVA alliance and after that Yuti (Sena bjp) alliance will be re-established in Maharashtra.)
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. सोमवारी सकाळी (11 डिसेंबर) उदय सामंत यांची उलटतपासणी झाली. त्यानंतर कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांची उलटतपासणी झाली.
हेही वाचा >> “तसं करून आपण अपात्रतेची कारवाई ओढवून घेतली आहे”, सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेची तत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उत्तर देताना दीपक केसरकर यांनी सुनावणीत सांगितले की, उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यावेळी मविआतून बाहेर पडून युती करण्यातबद्दल त्यांनी मोदींना सांगितले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दीपक केसरकर म्हणाले, “शिवसेना पक्षाची उद्दिष्टे आणि विचाराधारा हा मुद्दा मी उपस्थित केला होता. भाजप समविचार पक्ष आहे आणि निवडणुकीपूर्वी झालेल्या युतीसोबत आपण जायला हवे, असे सांगून मी उद्धव ठाकरेंचं मनपरिवर्तन केले होते.”
“त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणली. 8 जून 2021 रोजी उद्धव ठाकरे हे त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह दिल्लीला गेले होते. एक होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण. तिन्ही नेत्यांची पंतप्रधान मोदींसोबतची बैठक संपली. त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांची बैठक झाली होती”, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
मोदींना ठाकरेंनी काय दिले होते वचन? केसरकरांचा दावा
केसरकर यांनी सुनावणीत सांगितले की, “त्यानंतर मला उद्धव ठाकरे यांच्याकडून समजले की, दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर 15 दिवसांत महाविकास आघाडी बरखास्त करून महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना भाजप युती स्थापन करायची असे वचन उद्धव ठाकरेंनी मोदींना दिले होते”, असा गौप्यस्फोट केसरकरांनी उलटतपासणीत केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ठाकरेंनी मोदींकडे मागितला होता वेळ -केसरकर
केसरकरांनी पुढे सांगितले की, “नंतर उद्धव ठाकरे मला म्हणाले की, पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी आम्हाला वेळ हवाय, असा मेसेज पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवा. त्यांच्या मेसेज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी व्यवस्था केली. दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, असे बहुतांश नेत्यांना वाटतं होतं”, असं केसरकर म्हणाले.
हेही वाचा >> RSS स्वयंसेवक ते मुख्यमंत्री… कोण आहेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव?
“उद्धव ठाकरेंनी खूप वेळ घेतला, त्यामुळे मी ही माहिती पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना सांगितली. सुभाष देसाई, अनिल देसाई आणि एकनाथ शिंदेंना याबद्दल सांगितले आणि त्यांना म्हणालो की, लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना विनंती करा”, असं केसरकर यांनी उलटतपासणीत सांगितलं.
ADVERTISEMENT