Kunal Kamra : कंगना-केतकीसोबत असंच घडलेलं तेव्हा पवार-ठाकरेंनी काय केलेलं?
Kangana Ranaut: एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक कवितेनंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या या काव्यानं संतापलेल्या शिवसैनिकांनी थेट जिथे शूट झालं होतं, तो हॅबिटॅट स्टुडिओ फोडूला. या संपूर्ण घटनेवरुन आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या मुद्द्याची चर्चा होतेय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कंगना रणौत, केतकी चितळेसोबत काय घडलं होतं?

मविआच्या कार्यकर्त्यांनी तेव्हा काय केलं होतं?

कुणाल कामराच्या वादामुळे मविआ काळातील घटनांचीही चर्चा
Kunal Kamra : कुणाल कामराच्या स्टँड-अप कॉमेडीवर सोशल मीडियापासून ते राजकीय मंडळींपर्यंत दोन मतं मांडले जाताना दिसत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते व कार्यकर्ते विनोदाच्या पलीकडे जाऊन याला राजकीय वक्तव्य म्हणत टीका करत आहेत. या गोष्टीसाठी कुणाल कामराने माफी मागावी, अशी मागणी या लोकांकडून होतेय. तर दुसरीकडे विरोधक कुणाल कामराच्या कॉमेडीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत आहेत. कलाकाराला टीका करण्याचा, उपहासात्मक विनोद आणि भाष्य करण्याचा अधिकार असला पाहिजे, असं विरोधकांचं म्हणणं आहे.
हे ही वाचा >> Samay Raina : इकडे कुणाल कामरा वादात, तिकडे समय रैनाने मागितली माफी, पोलिसांना दिलेल्या जबाबात काय म्हणाला?
कुणाल कामरा हे काही चुकीचं बोलले असं मला वाटत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जो देशद्रोही आहे तो देशद्रोही आहे. कुणालने व्यंग नाही तर वास्तव मांडलं आहे, असं ठाकरे म्हणाले. मात्र, 2020 मध्ये ही परिस्थिती वेगळी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, सरकारवर झालेल्या टीकेमुळे कंगना रनौतला चांगलाच त्रास सहन करावा लागला होता.
कंगनाने उद्धव ठाकरेंवर केली होती टीका
कंगना रणौतने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारवर टीका केली होती. विशेषतः सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि मुंबई पोलिसांच्या भूमिकेबद्दल जोरदार हल्लाबोल केला होता. कंगनाने ट्विटमध्ये लिहिलं होतं की,
"मला मुंबईत असुरक्षित वाटतं आणि मुंबई पोलिसांवर माझा विश्वास नाही."
अभिनेत्री कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाने म्हटलं होतं, "मी कधीच चुकीची नाही आणि माझ्या शत्रूंनी हे वारंवार सिद्ध केले आहे. त्यामुळेच माझी मुंबई आता पीओके आहे." यानंतर संजय राऊत यांनी कंगनावर आरोप केला होता. कंगना महाराष्ट्राचा अपमान करतेय असं म्हटलं होतं. तेव्हा कंगनाने उद्धव ठाकरेंना ‘घराणेशाहीचं सर्वात वाईट प्रोडक्ट’ म्हटलं होतं.