Exclusive: रेवती Buildcon कंपनीसह पार्थ पवारांकडे 'एवढ्या' कंपन्यांचं संचालक पद!
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे सध्या एका जमीन घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. पण पार्थ पवार हे नेमक्या किती कंपन्यांमध्ये संचालक आहेत यावरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. जाणून घेऊया त्याचविषयी.
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील कोरोगाव पार्क येथील एका जमीन घोटाळा प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार यांचं नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणावरून विरोधकांनी रान उठवलं आहे. अशावेळी आता पार्थ पवार हे नेमक्या किती कंपन्यांमध्ये संचालक आहेत याबाबत देखील सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. जाणून घेऊया याचविषयी सविस्तरपणे.
पार्थ पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 1990 साली झाला असून, ते राजकारण आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहेत. 2019 साली त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने रिअल इस्टेट, अॅग्रो आणि फायनान्स क्षेत्रात ते कार्यरत आहेत. ते सध्या 3 सक्रिय कंपन्यांमध्ये संचालक आहेत.
रेवती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड (Revati Buildcon Private Limited)
कंपनीची माहिती: ही कंपनी 1981 मध्ये स्थापन झाली असून, मुख्यतः फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात कार्यरत आहे (CIN: U65993MH1981PTC025918). तिचे रजिस्टर्ड ऑफिस पुणे येथे आहे (अमर अविनाश कॉर्पोरेट सिटी, बंड गार्डन रोड). अधिकृत भांडवल ₹1 लाख आणि पेड-अप भांडवल ₹1 लाख आहे. कंपनी सक्रिय आहे आणि शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) 2024 मध्ये झाली.
पार्थ पवार यांचे पद: ते 27 सप्टेंबर 2016 पासून संचालक आहेत.










