Uddhav Thackeray : विधानसभेपूर्वी ठाकरेंना दिलासा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

udhhav thackeay shiv sena ubt big relief from election commision of india now party will accept donation vidhan sabha election 2024
ठाकरे गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निवडणूक आयोगाचा ठाकरेंना मोठा दिलासा

point

ठाकरे गटाला आता देणगी स्विकारण्यास परवानगी

point

शरद पवारांप्रमाणेच उद्धव ठाकरे यांना दिलासा

Uddhav Thackeray Shiv Sena, Election Commision Of India : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला आता देणगी स्विकारण्यास परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commision Of India) या निर्णयाने ठाकरेंच्या शिवसेनेच आनंदाचे वातावरण आहे.  (udhhav thackeay shiv sena ubt big relief from election commision of india now party will accept donation vidhan sabha election 2024) 

ADVERTISEMENT

ठाकरे गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत ठाकरे गटाला तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेले मशाल हे पक्षचिन्ह यापूढे कायम राहणार आहे. त्यामुळे कलम 29 बी नुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार नाहे. खरं तर शरद पवारांप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देणगी मिळण्याची मागणी केली होती. ठाकरेंची ही मागणी आता निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंनास मोठा दिलासा मिळणार आहे. 

हे ही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana : 'या' कागदपत्रात मिळाली मोठी सूट, आली नवीन अपडेट

शरद पवार गटाला असाच दिलासा 

दरम्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली होती. या सुनावणीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणारे तुतारी चिन्ह आता यापूढेही कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे कलम 29 बी नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्विकारता येणार नाहे. त्यामुळे शरद पवारांनंतर आता ठाकरेंना दिलासा दिला आहे. या दोन्ही पक्षांना आता विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Aanvi Kamdar Death: Video शूट करता-करताच गेला मुंबईच्या तरुणीचा जीव, तिथे गेली अन्...

निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आलेल्या निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं, पण आम्हाला देणगी स्वरुपात रक्कम घेण्याचा अधिकार दिलेला नव्हता तसेच कर लाभ देखील मिळत नव्हते. आता आमची विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही निवडणूक आयोगाकडे दुसरी एक विनंती केली. यामध्ये तुतारी चिन्हावरून होणाऱ्या संभ्रमावस्थेबद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दुसरी तुतारी देण्यात येऊ नये, अशी विनंती केली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये, असेही त्या म्हणाल्या आहेत. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT