Majhi Ladki Bahin Yojana : 'या' कागदपत्रात मिळाली मोठी सूट, आली नवीन अपडेट
Majhi Ladki Bahin Yojana Scheme : यंदाच्या वर्षी अनेक तरूणींची लग्न झाली आहेत. या तरूणींना कागदपत्राची जुळवाजुळव करणे खूपच अडचणीचे झाले आहेत. अशा नवविवाहितांसाठी आता सरकारने एका कागदपत्रात सुट दिली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महिला व मुलींनी कागदपत्राची जुळवाजुळव सुरु आहे.
कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात अडचणी येत आहेत.
'त्या' महिलांना कागदपत्रात दिली मोठी सूट
Majhi Ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहिन्याला 1500 रूपये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 21 ते 65 या वयोगटातील महिला व मुलींनी कागदपत्राची जुळवाजुळव सुरु केली आहे. मात्र या सगळ्यांमध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात नवविवाहितांना खूप मोठ्या अडचणी येत आहेत. यावर आता सरकारने नवविवाहितांना दिलासा दिला आहे. (majhi ladki bahin yojana newly marride girl get big relife on this document use husband ration card as document cm eknath shinde)
ADVERTISEMENT
खरं तर यंदाच्या वर्षी अनेक तरूणींची लग्न झाली आहेत. त्यामुळे या तरूणींना त्यांच्या कागदपत्रात अनेक बदल करून घ्यायची आहेत. काही नवविवाहितांनी त्यांच्या माहेरातील रेशन कार्डवरून नावं काढली नाही आहेत. तर काही नवविवाहितांनी माहेरातून रेशनकार्डवरून नाव काढले आहेत, परंतू अद्याप ते नवऱ्याकडील रेशनकार्डवर चढली नाही. त्यात त्याच्याजवळ उत्पन्नाचा दाखला देखील नाही. त्यामुळे त्यांची एका कागदपत्रांमुळे मोठी अडचण होत होती. आता यामध्ये राज्य सरकारने त्यांना दिलासा दिला आहे.
हे ही वाचा : Aanvi Kamdar Death: Video शूट करता-करताच गेला मुंबईच्या तरुणीचा जीव, तिथे गेली अन्...
राज्य सरकारने अशा नवविवाहितांना मोठा दिलासा दिला आहे. नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे नवविवाहितांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे वाचलं का?
नारीशक्ती दूत अॅपवरून असा भरा अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अॅप डाऊनलोड करावं लागेल. नारीशक्ती दूत असे या अॅपचे नाव आहे.
अॅप डाऊनलोड केल्यानंतर आधी तुमचा मोबाईल नंबर टाका. अटी आणि शर्थी या बटणवर क्लिक करा. त्यानंतर लॉगिन बटणावर क्लिक करा.
ADVERTISEMENT
आता चार अंकी ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल. तो टाका आणि व्हेरीफाय ओटीपी या बटणावर क्लिक करा.
ADVERTISEMENT
आता तुमचे प्रोफाईल भरा. म्हणजे तुमचे नाव, तुमचे गाव, जिल्हा आणि पत्ता. अशी सगळी विचारलेली माहिती भरा. नारीशक्ती या रकान्यात सामान्य महिला हा पर्याय निवडा.
हे ही वाचा : Pooja Khedkar Mother: घरगुती लॉजिंगमध्ये लपलेली मनोरमा खेडकर, अटकेची Inside Story
अर्ज भरून झाला की महिलांच्या योजना यावर क्लिक करा. माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करा.
आता तुमचा संपूर्ण अर्ज भरा. यात परत नाव, पतीचे नाव, जन्म तारीख, पत्ता अशी सगळी माहिती टाका.
सगळी आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा. यात आधार कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तो नसेल तर रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आदी. आणि नंतर फॉर्म सबमिट करा.
खात्यात पैसै कधी येणार?
राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, पहिला हफ्ता जमा करण्यासाठी सरकारने रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एका वर्षासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, उत्पन्न दाखला नसेल, तर पिवळे वा केशरी रेशन कार्डही ग्राह्य धरले जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT