Udhhav Thackeray : ''ये जो, है जो, काय...सुपारी थूक तोंडातली'', ठाकरेंकडून शिंदेंची मिमिक्री
Uddhav Thackeray News : संजय तुम्ही नागाची उपमा दिली.हा नागाचा अपमान आहे, हे मांडूळ आहेत, मोदींसमोर वळवळणारे मांडूळ आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ठाकरेंनी शिंदेंची खिल्ली उडवली
आणि म्हणून मी कुतून नाही बोलत
आम्हाला कष्टाचा पैसा पाहिजे असं शेतकरी म्हणतोय.
Uddhav Thackeray On Eknath Shinde : विक्रांत चव्हाण, ठाणे : ठाण्यातल्या गडकरी रंगायतन सभागृहातील सभेतून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेना डिवचलं आहे.इतकंच नाही तर ठाकरेंनी शिंदेंची सभेत मिमिक्री देखील केली आहे. ''आणि म्हणून मी कुतून नाही बोलत, असं कुतून मला येत नाही, आपण सरळ बोलतो आणि म्हणून'' असे म्हणत ठाकरेंनी शिंदेंची खिल्ली उडवली आहे. तसेच ''ये जो है, मशाल जो है वो, धनुष्यबाण जो है वो असं नाही रे, बोलायचं तर सरळ बोल ना रे, पहिली सुपारी थूक तोंडातली. पोट साफ करायचं द्या त्यांना औषध, निवडणुकीत त्यांना देऊ या'', अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंची मिमिक्री केली आहे.(udhhav thackeray criticize eknath shinde devendra fadnavis mahayuti thane gadkari rangayatan sabha maharashtra politics)
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. ''नमक हराम टूची उत्सुकता आहे. नागांचा मी अपमान करू शकत नाही. हे मांडूळ आहेत. गांडूळ नाही. हे दुतोंडी मांडूळ आहे. यांना फणा नाही. हे मोदींसमोर वळवळ करणारे मांडूळ आहे. हे लोटांगण घालतात. पँट तिकडे जाऊन खराब होत नाही. फोन आल्यावरच खराब होते. जसे असाल तसे या. फोन येताच पळतात. नशिब पँट घातलेली असते.'' अशी खिल्ली देखील ठाकरेंनी यावेळी उडवली आहे.
हे ही वाचा : Parambeer Singh : ''ठाकरे पवारांच्या घरी बैठका, फडणवीसांसह 'या' नेत्यांना अटक करण्याचा होता प्लॅन''
''मी ठाणेकरांचं कौतुक करायला आलोय. सर्व काही पळवलं. जोर जबरदस्ती आणि पैशाचं वाटप. तरीही सव्वापाच लाख ठाणेकर निष्ठेने आपल्या बाजूला राहिले. वैशाली ताई साधी कार्यकर्ती. समोर मिंध्याचं कार्ट. तरीही या साध्या शिवसैनिकाचा पराभव करायला विश्वगुरुंना आणलं. तरीही चार लाख मते मिळाली. हा आपला विजय आहे. प्रचंड पैसा ओतून मते मिळाली. तरीही विजय दिसत नाही म्हणून लांड्या लबाड्या केल्या'', अशी टीका देखील ठाकरेंनी शिंदेंवर केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आम्हाला भीक नको. आम्हाला कष्टाचा पैसा पाहिजे असं शेतकरी म्हणतोय. आमचा हक्क मारून टाकला जात आहे. कोपराला गूळ लावला जात आहे. गुजरातला प्रकल्प जात होते. तेव्हा मिंधे म्हणाले, काळजी करू नका मोदी मोठा प्रकल्प देणार आहे. कुठे आहे प्रकल्प? दिला? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
हे ही वाचा : Raj Thackeray : ''शरद पवारांसारखा 83 वर्षांचा माणूस...'', राज ठाकरे काय बोलून गेले?
लाडकी बहीणवरून देखील ठाकरेंनी भाष्य केले आहे.अहो 15 लाख देणार होते त्याचे 1500 काय केले, वरचे शुन्य कुणाच्या मिंधेंच्या खिशात गेले काय. जाऊ तिथे खाऊ हा यांचा धंदा आहे. 1500 रूपये लाच देऊन महाराष्ट्र विकू पाहतायत. तुमच्या पोरांना ते बेरोजगार ठेवू पाहतायत आणि सगळे उद्योगधंदे गुजराता देतायत, अशी टीकाही ठाकरेंनी महायुतीवर केली.
ADVERTISEMENT
''अयोध्येतही जमीन घोटाळा केला. आदर्श सारखा घोटाळा. आमच्या हाती घंटा. तिथे लोढाचा टॉवर. कारसेवकांचं रक्त काय लोढाचं टॉवर बांधायला दिलं होतं. सगळीकडे गुजरातचे कंत्राटदार आहेत. वाराणासीतही शंकराचार्य घरी आले होते. माझं भाग्य समजतो. त्यांनी हिंदुत्वाचा अर्थ सांगितला. जो विश्वासघात करतो तो हिंदुत्ववादी असू शकत नाही. ते संतापले होते. केदारनाथमधील ५०० किलो सोनं गायब झालं. अनेक पुराणकालीन मूर्त्या गायब झाल्या. हे तुमचं हिंदुत्व आहे. अयोध्येतील जमीन लढा खातोय, रामदेवबाबा खातोय. आपण जय श्रीराम करतो. ते केम छो म्हणत आहेत. आपल्याला भाजपमुक्त राम पाहिजे. जो नाही कामाचा तो नाही रामाचा. हे बिनकामाचे लोक आहेत. जाऊ तिथे खाऊ यालाच म्हणतात'', असा हल्ला देखील ठाकरेंनी महायुतीवर चढवला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT