दिशा सालियनच्या वडिलांचे आदित्य ठाकरेंवर नेमके कोणते आरोप?
दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पाहा याचिकेत नेमके काय आरोप करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

Disha Salian Death: मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतिश सालियन याने नव्याने याचिका दाखल करत शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरेंवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. हे आरोप प्रामुख्याने दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून आणि काही राजकीय नेत्यांच्या दाव्यांमधून समोर आले आहेत
दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये आदित्य ठाकरेंवर कोणते प्रमुख आरोप केले आहेत?
सामूहिक बलात्कार आणि हत्येचा सहभाग:
दिशाच्या वडिलांनी असे आरोप केले आहेत की, 8 जून 2020 रोजी दिशाच्या मालाडमधील घरी चाललेल्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते. या पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह 14व्या मजल्यावरून खाली फेकण्यात आला. याचिकेत असा दावा आहे की, आदित्य ठाकरेंचा या घटनेत सहभाग होता.
हे ही वाचा>> 'दिशावर गँगरेप अन्...' आदित्य ठाकरेंसह 5 जणांची नावं, खळबळ उडवून देणारी दिशाच्या वडिलांची याचिका जशीच्या तशी
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न:
सतीश सालियन यांनी असा आरोप केला आहे की, आदित्य ठाकरे यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. याचिकेत मुंबई पोलिसांवरही दबाव टाकून खोटे पुरावे स्वीकारण्यास भाग पाडल्याचा आणि सत्य लपवल्याचा दावा आहे.