'दिशावर गँगरेप अन्...' आदित्य ठाकरेंसह 5 जणांची नावं, खळबळ उडवून देणारी दिशाच्या वडिलांची याचिका जशीच्या तशी
Disha Salian Death petition: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांनी हायकोर्टात जी याचिका दाखल केली आहे त्यात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वाचा याच याचिकेतील काही महत्त्वाच्या गोष्टी.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दिशा सालियानच्या वडिलांनी दाखल केली याचिका

दिशा सालियानवर गँगरेप करून हत्या केल्याचा वडिलांचा आरोप

आदित्य ठाकरेंवर करण्यात आले अत्यंत गंभीर आरोप
Aditya Thackeray Disha Salian: मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्रात एक प्रचंड मोठं राजकीय वादळ उठलं होतं. ज्यामुळे अनेक उलथापालथी झाल्या. पण सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या आधी त्याची मॅनेजर राहिलेली दिशा सालियान (Disha Salian) या तरूणीचा 14 व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमध्ये केवळ 5 दिवसांचा फरक होता. पण आता दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
दिशा सालियान हिने आत्महत्या केली होती असं आतापर्यंतच्या पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीत म्हटलं होतं. मात्र, आज (19 मार्च) खुद्द दिशा सालियान हिचे वडील सतीश सालियान यांनी अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
दिशा सालियान हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. केवळ तिची हत्या झाली नाही तर आधी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि आपला गुन्हा लपविण्यासाठी तिची हत्या करण्यात आली. असा आरोप दिशाच्या वडिलांनी केला आहे.
यावेळी दिशाच्या वडिलांनी हे गंभीर आरोप तर केलेच आहेत. पण त्याचसोबत महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणारं एक नाव देखील त्यांनी घेतलं आहे. ते नाव म्हणजे शिवसेनेचे (UBT) माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं..