Lok Sabha 2024 : विरोधकांना UPA विसर्जित करून INDIA बनवण्याची गरज का पडली?
आता प्रश्न उपस्थित होतोय की, 2004 मध्ये स्थापन झालेली यूपीए अस्तित्वात होती, तर विरोधकांना नव्याने आघाडी निर्माण करण्याची गरज का पडली?
ADVERTISEMENT

INDIA vs NDA, Election 2024 : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आघाडीच्या नव्या नावाची घोषणा करण्यात आली. 26 विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते आणि नवीन आघाडीला भारतीय राष्ट्रीय विकास सर्वसमावेशक आघाडी म्हणजेच ‘इंडिया’ असे नाव देण्यावर एकमत झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत नव्या नावाची घोषणा केली. (the question is that when the alliance established in 2004 was UPA, then why did the opposition have to form a new alliance?)
या नव्या आघाडीच्या उदयाबरोबरच 2004 मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) नाव इतिहासाच्या पानात नोंदवले गेले. नव्या महाआघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांची यादी पाहिली तर अशा पक्षांची बहुतांश नावे यूपीए-1, यूपीए-2 सरकारमध्ये सहभागी आहेत किंवा बाहेरून पाठिंबा मिळालेली आहेत. दरम्यान आता असा प्रश्न उपस्थित होतोय की, 2004 मध्ये स्थापन झालेली यूपीए अस्तित्वात होती, तर विरोधकांना नव्याने आघाडी निर्माण करण्याची गरज का पडली?
2004 मध्ये काँग्रेस होती मजबूत
लोकसभा 2004 च्या निवडणुकीनंतर यूपीएची स्थापना झाली. तेव्हा काँग्रेस मजबूत स्थितीत होती. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत, काँग्रेसने 26.5 टक्के मतांसह 145 जागा जिंकल्या आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) 22.2 टक्के मतांसह 138 जागा जिंकल्या. मतांच्या टक्केवारीत काँग्रेसला भाजपपेक्षा 4.3 टक्के जास्त मते मिळाली होती. जागांच्या बाबतीतही काँग्रेसला भाजपपेक्षा सात जागा जास्त जिंकण्यात यश आले होते. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. काँग्रेसने 12 पक्षांसह यूपीएची स्थापना केली आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले.
वाचा >> Nagpur Crime : 14 किलो सोने, 200 किलो चांदी अन् 17 कोटी रोख; पोलिसही चक्रावले!
2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस मजबूत झाली. 28.6 टक्के मतांसह 206 जागा जिंकून पक्ष सत्तेवर परतला. काँग्रेस मजबूत झाली पण यूपीएतील पक्ष कमी झाले. अनेक जुने घटक यूपीएपासून वेगळे झाले होते, तर काही नवे घटकही सामील झाले होते. तृणमूल काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्ससारखे पक्षही यूपीएसोबत आले आणि आरजेडी, असदुद्दीन ओवेसी यांचा एआयएमआयएम, सपा, बसपा अशा अनेक पक्षांनी सरकारला बाहेरून बिनशर्त पाठिंबा दिला.