“उद्धवजी, पुन्हा एकदा शांतीने विचार करा”, फडणवीसांची भेट, सुधीर मुनगंटीवारांची ऑफर?
sudhir mungantiwar-uddhav thackeray news: वृक्ष लागवड योजनेसंदर्भात चर्चा सुरू असताना सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना फुटीचा मुद्दा छेडला. यावेळी मुनगंटीवारांना ऑफर वजा सल्लाही दिला.
ADVERTISEMENT

Sudhir Mungantiwar offer to Uddhav Thackeray: विधानभवन परिसरात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची चर्चा रंगलेली असतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे ऑफर दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या ऑफरची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वृक्ष लागवडीसंदर्भात प्रश्न विचारला. “सुधीर मुनगंटीवारांचा उद्देश चांगला आहे, पण अधिकार प्रतिसाद देत नाहीये. इको बटालियन सारख्या संस्था महाराष्ट्र देणार का?, असं अंबादास दानवे म्हणाले.
या प्रश्नाला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “विरोधी पक्षनेत्यांना माझं आवाहन आहे की, आपण आमदार निधीतून रस्ते करतो, इतर कामं करतो. मी आवाहन करेन की, यासाठी मी जीआर काढला की, कमीत कमी 25 लाखांची झाडं मतदारसंघात लावावी.”
संजय राऊतांचं संसदेतलं पद गेलं, ठाकरेंना शिंदेंकडून आणखी एक झटका!
“आपल्या आयुष्यात निसर्ग आपल्याला आजच्या बाजारभावाप्रमाणे साधारणतः 6 कोटी 13 लाख 20 हजार रुपयांचा ऑक्सिजन देतो. एक रुपया टॅक्स नाही. एक रुपयाचे बिल आम्ही पाठवत नाही. त्या मोबदल्यात आपण देतोय? ऑक्सिजन घेतोय, पण त्या मोबदल्यात काही द्यायची वृत्ती आपल्या सर्वांची असेल, तर मग ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांचीच राहील. ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांची होऊ नये हा माझा पहिल्या दिवशीपासूनचा आग्रह होता.”