सर्वात मोठी बातमी, सुप्रिया सुळे होऊ शकतात NCP च्या कार्याध्यक्ष!

साहिल जोशी

ADVERTISEMENT

supriya sule may become the working president of ncp after sharad pawar resignation announcement
supriya sule may become the working president of ncp after sharad pawar resignation announcement
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर पक्षात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. यावेळी शरद पवार यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांसाठी एक धक्कातंत्र वापरत राजीनाम्याची घोषणा केली. मात्र, या सगळ्या घडामोडीनंतर आत्ता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खात्रीलायक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष होऊ शकतात. असं झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण राजकारणाला एक नवी दिशा मिळू शकते. याच बातमीबाबत आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊयात. (supriya sule may become the working president of ncp after sharad pawar resignation announcement)

शरद पवारांनी ठरवून केली राजीनाम्याची घोषणा…

शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा ही ठरवून दिली होती. कारण पवारांचं आजचं भाषण हे लिहून आणलेलं होतं. कारण सहसा मराठी भाषण शरद पवार लिहून आणत नाही. मात्र, आज त्यांनी लिहून आणलेलं भाषण वाचलं आणि त्यातच आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यामुळेच राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेश राष्ट्रवादीकडून देण्यात आले होते.

सुप्रिया सुळे होऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष

दरम्यान, आजच्या दिवसातील सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष किंवा कार्यकारी अध्यक्ष होऊ शकतात. जर शरद पवार यांनी विचार बदलला नाही तर अशा पद्धतीचा विचार हा होऊ शकतो. असं सूत्रांकडून समजतं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ब्रेकिंग न्यूज: शरद पवारांच्या निर्णयानंतर हाय होल्टेज ड्रामा! जयंत पाटील ढसाढसा रडले

शरद पवार यांनी अचानक निर्णय घेतला का? तर तसं नाही.. शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी म्हणजे सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, प्रतिभा पवार आणि अजित पवार यांना कल्पना देऊनच राजीनाम्याची आज घोषणा केली.

पुस्तक प्रकाशनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना का बोलावलेलं?

शरद पवार यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला पक्ष कार्यालयातून राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. याचा अर्थ असा की, शरद पवारांनी हे ठरवलं होतं की, पक्षाच्या सर्व नेत्यांसमोर जाऊन त्यांनी ही भूमिका मांडावी. त्याप्रमाणेच शरद पवार यांनी केलं. पण त्याचवेळी अनेकांनी शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा असा आग्रह धरला.

ADVERTISEMENT

आता यावर विचार करण्यासाठी शरद पवार यांनी 2-3 दिवस घेतले आहेत. पण जर शरद पवारांनी आपला निर्णय बदलला नाही तर कदाचित सुप्रिया सुळे यांना पक्षात नवीन पद निर्माण करून त्यांच्याकडे कमान सोपविण्याची तयारी करता येऊ शकते. ही शक्यता अजिबातच नाकारता येत नाही.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> NCP: अन् शरद पवारांच्या समोरच कार्यकर्त्याने थेट अजितदादांनाच सुनावलं, तुम्हाला…

याचं कारण असं आहे की, अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते अजित असणार हे अधोरेखित झालं आहे. कारण राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व ते करत आहेत. पण पक्षाचं नेतृत्व हे सुप्रिया सुळेंकडे जाऊ शकतं ही गोष्ट कुठे तरी त्यातून बाहेर येत आहे. राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या अत्यंत महत्त्वाच्या सूत्राकडून ही माहिती मुंबई Tak च्या हाती लागली आहे.

शरद पवारांचं धक्कातंत्र?

राष्ट्रवादीत कधीही नंबर 2 चं पद शरद पवारांनी निर्माण केलं नव्हतं. गेल्याच वर्षी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली 5 वर्षांसाठी. खरं तर गेल्या वर्षीच शरद पवार सांगू शकले असते की, मी अनेक वर्ष पक्षाचा अध्यक्ष आहे. ही माझी शेवटची टर्म असेल.. पण अशी कोणतीही भूमिका न मांडता शरद पवारांनी आज अचानक निर्णय घेतला असं दाखवण्याचा प्रयत्न होता.

हे ही वाचा>> ‘भाकरी फिरवणार होते,पण तवाच फिरवला’, नेमकं कोणी केलं ट्विट?

या संदर्भात असं काही तरी पाऊल टाकलं जाईल की, शरद पवारांनंतर अध्यक्ष पदाची धुरा कोण सांभाळणार याबाबतची स्पष्टता आणि सूत्रांच्या माहितीनुसार ते नाव सुप्रिया सुळेच असू शकतं. त्यांचं नाव कदाचित दिलं जाऊ शकतं. पण हे पद सुप्रिया सुळेंकडे जाऊ शकतं हे अधोरेखित होत आहे.

शरद पवार यांनी निर्णय जाहीर करताना धक्कातंत्राचा वापर केला. पक्षात आजही मी सर्वोच्च आहे हे देखील या सगळ्या प्रक्रियेतून शरद पवार यांनी दाखवून दिलं आहे. दुसऱ्या बाजूला पक्षाची नवी बांधणी करण्यास देखील शरद पवार यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळेच कार्याध्यक्ष पदासाठी सुप्रिया सुळे हे नाव देखील दिलं जाऊ शकतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT