आदित्य ठाकरे येण्याआधीच जळगावात तणाव; मंत्री गुलाबराव पाटलांच्या धरणगावात ठाकरेंचं बॅनर फाडलं
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच जळगावात शिंदे गट व उद्धव ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. गुलाबराब पाटील यांचा मतदार संघ असलेल्या धरणगाव प्रवेश मार्गावरील आदित्य ठाकरे यांचे स्वागताचे बॅनर कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना मध्यरात्री घडल्याने त्यावरून धरून गावात तणाव निर्माण झाला. […]
ADVERTISEMENT

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच जळगावात शिंदे गट व उद्धव ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. गुलाबराब पाटील यांचा मतदार संघ असलेल्या धरणगाव प्रवेश मार्गावरील आदित्य ठाकरे यांचे स्वागताचे बॅनर कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना मध्यरात्री घडल्याने त्यावरून धरून गावात तणाव निर्माण झाला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे.
आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज शनिवारी जळगाव जिल्ह्यात येत आहे. पाचोरा धरणगाव पारोळा या बंडखोरांच्या मतदारसंघात त्यांच्या सभा होणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा आज धरणगावात ज्या मार्गाने प्रवेश होणार आहे. त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला आहे. आता यावर आदित्य ठाकरे आपल्या सभेत काय बोलतात हे पहावं लागेल.
शिवसेना कोणाची? यासाठी वाद
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेत मोठी फूट पाहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात आता शिंदे गटाने आपले पदाधिकारी निवडी सुरु केल्या आहेत. शिवसेना कोणाची यावरून वाद सुरु आहे. सध्या उद्धव ठाकरे यांची सेना आणि शिदं गट दोन्हीकडून चिन्ह आणि पक्षासाठी न्यायालयीन लढाई सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी शिंदे गट सक्रिय झाले आहे.
आदित्य ठाकरेंची राज्यभर शिवसंवाद यात्रा
उद्धव ठाकरे गटाकडून कार्यकर्ते आहे त्या जागी रहावे यासाठी प्रयत्न सुरु आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या जिल्ह्यात शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. यापूर्वी भिवंडी, नाशिक, औरंगाबाद, परभणी, रायगड, महाड, अहमदनगर यांसह इतर बंडखोर आमदारांच्या जिल्ह्यात शिव संवाद यात्रा त्यांनी काढली होती. वरील सर्व ठिकाणी आदित्य ठाकरेंना चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
शिव संवाद यात्रेदरम्यान मनमाडमध्येही झाला होता राडा
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर याच यात्रेतून आदित्य हे बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवत आहे. तसेच आपल्या प्रत्येक भाषणातून शिवसेना सोडून गेलेले बंडखोर नव्हे तर गद्दार असल्याचा उल्लेख आदित्य ठाकरे करतांना पाहायला मिळत आहे. यादरम्यान मनमाड येथे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. आता जळगावात आदित्य ठाकरेंचं बॅनर फाडल्याने वाद उदभवू शकतो.