Uddhav Thackeray: “धनुष्यबाण शिवसेनेचाच आहे, शिवसेनेचाच राहणार”

मुंबई तक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण हा आपल्याकडेच राहणार असं सांगितलं आहे. पक्ष चिन्हाबाबत कुणीही चिंता करू नका. ते आपल्याकडेच राहणार असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं. एक चर्चा चालली आहे ती म्हणजे चिन्हावर. धनुष्यबाण कुणाकडे जाणार? धनुष्यबाण शिवसेनेकडून कुणीही हिरावून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण हा आपल्याकडेच राहणार असं सांगितलं आहे. पक्ष चिन्हाबाबत कुणीही चिंता करू नका. ते आपल्याकडेच राहणार असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं.

एक चर्चा चालली आहे ती म्हणजे चिन्हावर. धनुष्यबाण कुणाकडे जाणार? धनुष्यबाण शिवसेनेकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर धनुष्यबाण हे चिन्ह आहे. ते आपलंच चिन्ह आहे ते आपलंच चिन्ह राहणार असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. नुसतं चिन्हच लोक बघत नाहीत धनुष्यबाण हाती घेणाऱ्याची चिन्हंही लोक पाहतात. याची चिन्हं बरी आहेत का? लक्षणं बरी आहेत का हे देखील लोक पाहातात असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कुणीही चोरून नेऊ शकेल अशी काही शिवसेना नाही. रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरत असतो. जनता नंतर त्यांना निवडून देते. एक आमदार असलेला पक्ष आहे असं समजा तो निघून गेला की पक्ष संपला का? तर तसं होत नाही. पक्ष संपत नाही. विधीमंडळ पक्ष वेगळा आणि रजिस्टर्ड पार्टी वेगळी असते असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेचाच राहिल हे घटना तज्ज्ञांनी बोलून मी आपल्या सगळ्यांना सांगतो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

काय वाट्टेल ते होऊ दे आम्ही तुमच्यासोबतच आहोत असं माझ्यासोबत असलेल्या १५-१६ आमदारांनी मला सांगितलं आहे. त्यांच्या धीराचं मला कौतुक आहे. आपल्याकडे अजूनही असत्यमेव जयते असं म्हणत नाहीत. सत्यमेव जयते म्हणतात. माझा न्यायालयावर आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp