Uday Samant: ''प्रति शिवसेना भवन उभारण्याचा आमचा मानस नाही, पण...''

शिंदे मंत्रिमंडळाचा मिनी विस्तार झालेला आहे. आता फक्त खातेवाटप राहिलेलं आहे. शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे.
Uday Samant
Uday Samant Photo- Twitter

राकेश गुडेकर, रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी: शिंदे मंत्रिमंडळाचा मिनी विस्तार झालेला आहे. आता फक्त खातेवाटप राहिलेलं आहे. शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर सतत उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्यात येत आहे. मग कायदेशीर असो की संघटनात्मक. मागच्या काही दिवसांपासून एक बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे गट दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार आहे. यावरती आता मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले मंत्री उदय सामंत?

कुठेही प्रति शिवसेना भवन उभारण्याचा आमचा मानस नाही. रत्नागिरी, चिपळूण आणि सिंधुदुर्गमध्येही आमचं कार्यालय असेल, जिथं जिथं आमची पूर्वीची कार्यालये होती त्याच्या पेक्षा ताकदीने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची कार्यालये असतील असं उदय सामंत म्हणाले आहेत. त्यामुळे प्रति शिवसेना भवन उभारण्याच्या चर्चांना सध्या तरीस ब्रेक लावण्याचा प्रयत्न उदय सामंत यांनी केला आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी मुंबई तकशी बोलताना प्रति शिवसेना भवनाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. सदा सरवणकर म्हणाले होती की प्रति शिवसेना भवन उभारायचं नाही. फक्त कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांना भेटता यावं म्हणून दादरमध्ये कार्यालय उभारणार आहोत. दादर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यानं दादरमध्ये कार्यालय उभारण्यात येणार आहे.

खातेपाटपाचा तिढा संपलेला आहे- उदय सामंत

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून खातेवाटप कधी होणार याची प्रतीक्षा आहे. मात्र उदय सामंत यांनी आता स्पष्टच सांगितले आहे. ''खाते वाटपाचा तिढा संपलेला आहे. मी रत्नागिरीमध्ये पोहचेपर्यंत खाते वाटपाचा प्रश्न सुटेल, आणि आम्हाला सर्वांना खाती मिळतील असे उदय सामंत म्हणाले आहेत.

विनायम मेटेंच्या निधनावरती काय म्हणाले उदय सामंत?

''मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी विनायक मेटे यांचं जे स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे, ते पूर्ण करणं हेच शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं प्राधान्य असेल. घरचा नेता हरपला याची खंत आणि दुःख मनामध्ये आहे'' असे उदय सामंत म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in