‘आमदार-खासदारांना खोके मिळतात, पण..’, ठाकरेंचं शिंदेंच्या वर्मावर बोट

मुंबई तक

Uddhav Thackeray Vs Eknath shinde, Maharashtra budget Session: मुंबई: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी विरोधकांकडून होतेय. याच मागणीवरून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. खोक्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदेंच्या वर्मावर बोट ठेवलं. सामना अग्रलेखात ठाकरेंनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Uddhav Thackeray Vs Eknath shinde, Maharashtra budget Session: मुंबई: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी विरोधकांकडून होतेय. याच मागणीवरून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. खोक्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदेंच्या वर्मावर बोट ठेवलं.

सामना अग्रलेखात ठाकरेंनी काय म्हणलंय?

-“महाराष्ट्रात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न कमी व राजकीय मुद्देच जास्त उचलले जात आहेत. बुधवारी सकाळी विरोधी पक्षनेत्यांनी अवकाळी नुकसानीचा मुद्दा विधानसभेत उचलून सरकारला धारेवर धरले, तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांनाच बजावले. ‘राजकारण करू नका, तुम्ही राजकारण करणार असाल तर मग आम्हालाही करावे लागेल. मागच्या चक्रीवादळाच्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही,’ असा बाण फडणवीस यांनी सोडला. त्यांचे हे बोलणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसल्याचे उदाहरण आहे.”

मोदी-शाह महाराष्ट्राला ठेंगा दाखवून निघून गेले – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

-“राज्याला जेव्हा चक्रीवादळाचा तडाखा बसला, त्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले तेव्हा कोरोना काळ होता. त्या वेळी महाराष्ट्राच्या तिजोरीवर मोदींचे सरकार भुजंगासारखे बसून राहिले होते. चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा वगैरे तत्काळ गुजरातेत पोहोचले, पण त्यांनी नुकसानग्रस्त महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. गुजरातला चक्रीवादळाची भरपाई म्हणून तत्काळ 1500 कोटी की काय ते दिले. पण महाराष्ट्राला ठेंगा दाखवून निघून गेले व त्यानंतर या ठेंगेवाल्यांनी महाराष्ट्राचे सरकारच खोके मोजून पाडले. फडणवीस यांनी राजकारणाचा संदर्भ दिला म्हणून ही माहिती दिली.”

Narayan Rane: ‘शिंदे.. कोणाला पैसे नेऊन देत होते?’, राणेंचे ठाकरेंवर आरोप

हे वाचलं का?

    follow whatsapp