Nitin Gadkari: "आम्ही एकनाथ शिंदेंना असं अमृत पाजलंय की त्यांची गाडी बुलेट ट्रेनच्याही पुढे जाईल"

जाणून घ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी काय म्हटलं आहे?
Nitin gadkari said maharashtra development will take place under leadership of eknath shinde devendra fadnavis

आम्ही एकनाथ शिंदे यांना असं अमृत पाजलं आहे की त्यांची गाडी आता सुसाट जाईल. बुलेट ट्रेनच्या पुढे जाऊन ते प्रगती करतील असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचं कौतुक केलं आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून ७५ व्या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमातील संकल्प ते सिद्धी ची परिषद मुंबईतल्या ताज पॅलेसमध्ये पार पडली. याच बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. आम्ही त्यांना असं अमृत पाजलं आहे की त्यांची गाडी आता थांबणार नाही. आता महाराष्ट्राची विकासाची यात्रा बुलेट ट्रेनपेक्षा जास्त वेगाने पुढे जाईल असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र हे देशाचे विकासाचं इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या विकासात आर्थिक विकासात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. सेवा, आरोग्य, कृषी या विषयांमध्ये उत्तम काम केलं आहे. येणाऱ्या काळात बांधले जाणारे रस्ते, रोप वे यामुळे पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in