उपराष्ट्रपती निवडणूक २०२२ : धनकड की, अल्वा… उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेणार?
राष्ट्रपती निवडणुकीचं मतदान पार पडत नाही तोच उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी राजकीय बैठका सुरू झाल्यात. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपापासून दूर गेलेल्या शिवसेनेनं आदिवासी समुदायाचा चेहरा असलेल्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांच्या पदरात मतं टाकली. आता उपराष्ट्रपती निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. एनडीएचे उमेदवार म्हणून भाजपने जगदीप धनकड यांना […]
ADVERTISEMENT

राष्ट्रपती निवडणुकीचं मतदान पार पडत नाही तोच उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी राजकीय बैठका सुरू झाल्यात. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपापासून दूर गेलेल्या शिवसेनेनं आदिवासी समुदायाचा चेहरा असलेल्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांच्या पदरात मतं टाकली. आता उपराष्ट्रपती निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.
उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. एनडीएचे उमेदवार म्हणून भाजपने जगदीप धनकड यांना उमेदवारी दिली आहे, तर युपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
धनकड की अल्वा? उद्धव ठाकरे कुणाला देणार पाठिंबा?
‘राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत विरोधी गटातील उमेदवारांना पाठिंबा देण्याची शिवसेनेची परंपरा आहे’, असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीनंतर पक्षातील खासदारांनी मुर्मु यांना पाठिंबा देण्याची आग्रही मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती, असं बोललं गेलं.
बहुसंख्य खासदारांनी भाजपने दिलेल्या उमेदवार मुर्मु यांना पाठिंबा देण्याबद्दल बैठकीत भूमिका घेतली होती. आमदारांच्या बंडानंतर काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावरून विधिमंडळापाठोपाठ संसदेतही पक्षफुट नको, अशा भूमिकेतून शिवसेनेनं मुर्मु यांना पाठिंबा दिल्याचं सांगितलं जातं.