महाराष्ट्र काय पाकिस्तानमध्ये होता का?, आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
मुंबई: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यापासून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवरती टीका करत आहेत. काल देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात काय पाकिस्तानात आहे का? असा प्रश्न टीकाकारांना केला होता. त्यावर आता शिवसेना नेते आदित्या ठाकरेंनी पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे काय म्हणाले? आदित्य ठाकरे […]
ADVERTISEMENT

मुंबई: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यापासून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवरती टीका करत आहेत. काल देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात काय पाकिस्तानात आहे का? असा प्रश्न टीकाकारांना केला होता. त्यावर आता शिवसेना नेते आदित्या ठाकरेंनी पलटवार केला आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आदित्य ठाकरे फडणवीसांनी उत्तर देताना म्हणाले ”प्रकल्प गुजरातमध्ये पळवून न्यायला महाराष्ट्र हा काय पाकिस्तान होता का? राज्यात रोजगार येणार होता. तो हिरावून घेतला. आमच्या महाराष्ट्राच्या पोरांनी काय चूक केली?”. यावेळी आदित्या ठाकरेंना नारायण राणेंविषयी विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. ”माझ्यावर घरच्यांचे संस्कार आहेत. त्यामुळे मी काही बोलत नाही” असा टोमणा आदित्या ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे लगावला आहे.
आशिष शेलारांच्याही टीकेला दिलं उत्तर
आशिष शेलार यांनी वेदांता प्रकल्पावरुन महाविकास आघाडीवरती कमिशनखोरीचा आरोप केला आहे. आघाडी सरकारनं १० टक्के कमिशन मागितल्याचा आरोप शेलार आणि फडणवीसांनी केला आहे. त्यावर बोलताना आदित्या ठाकरे म्हणाले ”चौकशी कुणाची करणार? प्रकल्प का नाही आला? केंद्राची चौकशी करणार की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चौकशी करणार?”. 26 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं वेदांता 4 लाख कोटींची गुंतवणूक घेऊन येणार आहे. तुमचा दावा पत्रात होता. मग हे का नाही झालं? जी गुंतवणूक 100 टक्के आपल्या महाराष्ट्रात होणार होती, ती का झाली नाही? असा सवालही आदित्य ठाकरेंनी यावेळी विचारला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय वक्तव्य केलं होतं?
गेल्या दोन वर्षांत राज्याने पहिला क्रमांक गमावला आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर गेले आहे. तेथील तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक या काळात २३ अब्ज डॉलर्सवर गेली. महाराष्ट्र मात्र १८ अब्ज डॉलर्सवर घसरला. केवळ गुजरातविरोधात भाषणे देऊन चालणार नाही, आपल्या राज्यासाठी चांगल्या योजना आखाव्या लागतात. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही, लहान भाऊच आहे असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.