एकनाथ शिंदेंकडून काही प्रस्ताव आलाय का?, चंद्रकांत पाटील म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिपक सुर्यवंशी

कोल्हापूर: एकनाथ शिंदेंच्या बंडामध्ये भाजप शांत का आहे असा प्रश्न विचारला जात आहे. एकनाथ शिंदेंना भाजपचा पाठिंबा आहे अशी चर्चा सध्या रंगत आहेत. याच पार्श्वभूमिवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सारखे दिल्लीला का जात आहेत? असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील म्हणाले ”देवेंद्र फडणवीस हे गेले तीन दिवस सतत कार्यकर्त्यांच्या कामासाठी दिल्लीला जात आहेत”.

पुढे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले ”शिवसेनेतील बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे एकनाथ शिंदे यांनाच विचारावं लागेल. राज्यात ज्या काही हालचाली सुरू आहेत, त्या टीव्हीवरच दिसतात, आपला त्याच्याशी संबंध नाही. शरद पवार, संजय राऊत यांना जरा जास्तच अभिव्यक्तिस्वातंत्र्य असल्याने ते सतत बोलत असतात. राऊत तर सकाळी एक तर दुपारी दुसरेच बोलतात अशी टिका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मोहित कंबोज सर्वांचे मित्र म्हणून तिथे’

एकनाथ शिंदे यांच्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले ”त्यांच्यासोबत कोण गेलेत, कोण जाणार आहेत, कोण परत येणार आहेत याबाबत आपल्याला काहीही माहित नाही. शिंदे यांच्यासोबत मोहित कांबोज असतील तर ते एकनाथ शिंदे यांचे मित्र असल्याने सोबत असतील. कंबोज हे सर्व पक्षातील नेत्यांचे मित्र आहेत त्यामुळे कदाचित ते सर्वत्र दिसतात.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

‘एकनाथ शिंदेंकडून प्रस्ताव नाही’

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंकडून काही प्रस्ताव आलाय का असे विचारले असता पाटील म्हणाले ”एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आला नाही, प्रस्ताव आला तर पक्षाची 13 जणांची कार्यकारणी आहे, त्यापुढे चर्चा करून तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल. मी सध्या कोल्हापुरात आलो आहे, माझे रुटीन कार्यक्रम सुरू आहेत, काही राजकीय हालचाली भाजप कडून सुरू असते तर मला कोल्हापुरात येऊ दिले असते का?” असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT