महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का देणारे बाप-लेक, काय म्हणाले काँग्रेसबद्दल?

मुंबई तक

Tambe Father and Son Vidhan parishad election 2023: नाशिक: राज्यात मागील काही काळापासून प्रत्येक निवडणूक (Election) ही अत्यंत रंजक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातही जेव्हा विधान परिषदेची (Vidhan Parishad) निवडणूक असते तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला काही तर नवं आणि आश्चर्याचा धक्का देणाऱ्या गोष्टी घडतात. असाच एक मोठा धक्का आज काँग्रेसच्या (Congress) तांबे (Tambe) पिता-पुत्रांनी दिला आहे. . […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Tambe Father and Son Vidhan parishad election 2023: नाशिक: राज्यात मागील काही काळापासून प्रत्येक निवडणूक (Election) ही अत्यंत रंजक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातही जेव्हा विधान परिषदेची (Vidhan Parishad) निवडणूक असते तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला काही तर नवं आणि आश्चर्याचा धक्का देणाऱ्या गोष्टी घडतात. असाच एक मोठा धक्का आज काँग्रेसच्या (Congress) तांबे (Tambe) पिता-पुत्रांनी दिला आहे. . (what exactly did father and son who shocked entire maharashtra say about congress party)

नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीसाठी काँग्रेसचे सत्यजीत तांबे हे इच्छुक होते. असं असताना काँग्रेसने ऐन मोक्याच्या क्षणी सत्यजीत तांबेच्याच वडिलांना म्हणजे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना काँग्रेसचं उमेदवार म्हणून जाहीर केलं. पण काँग्रेसच्या या अतंर्गत राजकारणासाठी मुरब्बी बाप-लेक हे सज्ज होते. त्यांनी देखील अगदी शेवटच्या क्षणी एक अशी खेळी केली ज्याने फक्त काँग्रेस पक्षालाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला.

विधान परिषद निवडणूक 2023: पाच मतदारसंघात कोण कोणाला भिडणार?

काँग्रेसने अधिकृत उमेदवार म्हणून सुधीर तांबेंची घोषणा केली, त्यांच्यासाठी एबी फॉर्म देखील पाठवला. मात्र, सुधीर तांबेनी आपल्या मुलासाठी म्हणजेच सत्यजीत तांबेंसाठी आमदारकी न लढविण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर सत्यजीत तांबेंनी थेट अपक्ष फॉर्म भरला. ज्यामुळे काँग्रेसमधील नेमकं राजकारण देखील चव्हाट्यावर आलं आहे. या सगळ्या घडामोडीनंतर तांबे पिता-पुत्रांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्यामध्ये त्यांनी काही गोष्टी उघडउघडपणेच सांगून टाकल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp