सचिन पायलट यांच्याशी नेमका वाद काय?, अशोक गेहलोत त्यांना रोखण्यासाठी हायकमांडला भिडले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्याची गोष्ट गांधी परिवारासाठी डोकेदुखी ठरली आहे. अशोक गहलोत पुढे आले नसले तरी त्यांच्या जवळच्या आमदारांनी सचिन पायलट यांच्याविरोधात बंडखोराची भूमिका घेतली आहे.

मुख्यमंत्री निवडीसाठी काँग्रेसने बोलावलेली विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकली नाही आणि हायकमांडचा निरोप घेऊन जयपूरला गेलेले निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे-अजय माकन रिकाम्या हाताने दिल्लीला परतले. हा सचिन पायलट यांचाच विरोध नसून काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाचा थेट विरोध आहे. प्रश्न असा आहे की पायलट यांच्यावर गहलोत यांची नाराजी काय आहे की त्यांना रोखण्यासाठी अशोक गेहलोत गांधी कुटुंबाच्या विरोधात उभे राहिले?

….म्हणून सचिन पायलट अशोक गहलोत यांना मान्य नाहीत

राजस्थानच्या राजकारणाचे जादूगार मानले जाणारे अशोक गहलोत यांनी आपल्या 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात एका मोठ्या नेत्याचा पराभव करून राजकीय वर्चस्व कायम राखले आहे. परंतु कोणत्याही नेत्याने त्यांच्यासमोर खरोखरच तगडे आव्हान उभे केले असेल तर त्या व्यक्तीचे नाव आहे सचिन पायलट. गहलोत 2018 मध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री झाले परंतु, गेल्या साडेचार वर्षांपासून पायलट यांच्यामुळे त्यांना शांत झोप लागली नाही. आपले सरकार वाचवण्यासाठी त्यांना दोनवेळा आमदारांवरती महिनाभर पहारा ठेवावा लागला होता. यामुळेच गेहलोत यांना पायलट अजिबात मान्य नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

”सचिन पायलट सोडून कोणालाही मुख्यमंत्री करा”

काँग्रेस हायकमांडने सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला असेल, परंतु मुख्यमंत्री गहलोत पायलट वगळता इतर कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री करण्यास तयार आहेत. गहलोत गटातील सर्व आमदारांनी सचिन पायलट यांच्याऐवजी कुणालाही मुख्यमंत्री करण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घ्यावा, तो आम्हाला मान्य असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

राहुल गांधींनी काँग्रेसची कमान हाती घ्यावी- अशोक गहलोत

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची चर्चा केली, तेव्हाच त्यांच्या लक्षात आले की, निवडून आल्यास राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. गांधी घराणे सचिन पायलट यांना त्यांच्या जागी मुख्यमंत्री बनवू शकते, याची कल्पना गहलोत यांना होती. त्यामुळेच राहुल गांधींनी काँग्रेसची कमान हाती घ्यावी या प्रयत्नात अशोक गेहलोत अडकले आहेत. त्यासाठी त्यांनी प्रस्तावही मंजूर करून घेतला, नंतर भारत जोडो यात्रेमध्ये जाऊन राहुल गांधींनी प्रस्ताव स्वीकारावा म्हणून विनंती केली परंतु ते राजी झाले नाहीत.

ADVERTISEMENT

राहुल गांधींनी करुन दिली ‘एक व्यक्ती एक पद’ धोरणाची आठवण

गांधी घराण्याशी असलेल्या त्यांच्या निष्ठेमुळे अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्यास सहमती दर्शवली होती. परंतु, राजस्थानमध्ये त्यांच्या जागी मुख्यमंत्री कोण होणार याचे पत्ते उघडले नव्हते. ते म्हणाले की काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतरही कोणीही मुख्यमंत्री किंवा मंत्री राहू शकतो, परंतु जेव्हा राहुल गांधींनी उदयपूरच्या ठरावांतर्गत ‘एक व्यक्ती एक पद’ ची गोष्ट सांगितली त्यावेळी गेहलोत यांनी आपली भूमिका बदलली. 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात खूप काही मिळाले असून नव्या पिढीने पुढे यायला हवे, असे ते म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT