पंतप्रधान मोदींची लोकसभेत तुफान फटकेबाजी, भाषण जसंच्या तसं!

मुंबई तक

PM Modi Loksabha Speech Today: नवी दिल्ली: देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session of Parliament) पंतप्रधान मोदींनी (PM ModI) लोकसभेत (Loksabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत तब्बल 1 तास 25 मिनिटं भाषण केलं. आपल्या या संपूर्ण भाषणात त्यांनी फक्त काँग्रेसवरच टीकेची झोड उठवली. काँग्रेसने केवळ संधीचं रुपांतर संकटातच केलं अशी जहरी टीका मोदींनी यावेळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

PM Modi Loksabha Speech Today: नवी दिल्ली: देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session of Parliament) पंतप्रधान मोदींनी (PM ModI) लोकसभेत (Loksabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत तब्बल 1 तास 25 मिनिटं भाषण केलं. आपल्या या संपूर्ण भाषणात त्यांनी फक्त काँग्रेसवरच टीकेची झोड उठवली. काँग्रेसने केवळ संधीचं रुपांतर संकटातच केलं अशी जहरी टीका मोदींनी यावेळी केली. पाहा या संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले. (what if prime minister modi actually spoke in the lok sabha)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोकसभेतील भाषण जसंच्या तसं:

‘काही लोकांना देशाची प्रगती स्वीकारता येत नाही’

विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आज देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. काही लोकांना ते स्वीकारता येत नाही. आज खेळाडू आपला दर्जा दाखवत आहेत. भारताच्या डंका जगभरात वाजत आहे. भारत हे उत्पादनाचे केंद्र बनले आहे. आज देशातील प्रत्येक क्षेत्रात आशा दिसू लागली आहे, परंतु काही लोकांना ती दिसत नाही.’

काका हथरसी यांचा हवाला देत मोदी म्हणाले की, ‘जो जसा विचार करेल, त्याला तसंच दिसेल. काही लोक निराश झाले आहेत. ही निराशा अशीच आलेली नाही. एक तर जनतेचा आदेश, पुन्हा.. पुन्हा.. आदेश. 2014 पूर्वी अर्थव्यवस्था ही डबघाईला आली होती, महागाई दोन अंकी होती. पण आता काहीतरी चांगले घडते त्यामुळे विरोधकांमध्ये निराशा निर्माण होतेय.

हे वाचलं का?

    follow whatsapp