Patna : भाजपविरोधात फुंकणार रणशिंग, पण विरोधी पक्षांची ताकद किती?

मुंबई तक

नितीशकुमारांनी बोलवलेल्या या बैठकीला हजेरी लावणाऱ्या पक्षांची एवढी ताकद काय आहे की ते भाजपशी लढायचेच नाही तर पराभवही करायचे एवढ्या आत्मविश्वासाने बोलत आहेत?

ADVERTISEMENT

patna meeting : Leaders of opposition parties are repeatedly claiming that the National Democratic Alliance (NDA) led by the Bharatiya Janata Party (BJP) can be defeated if all parties unite.
patna meeting : Leaders of opposition parties are repeatedly claiming that the National Democratic Alliance (NDA) led by the Bharatiya Janata Party (BJP) can be defeated if all parties unite.
social share
google news

Patna Opposition Meeting : 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बिहारची राजधानी पाटणा येथे आज विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत महत्त्वाची बैठक होत आहे. विरोधी पक्षांच्या या बैठकीत एकूण 17 पक्ष सहभागी होणार होते, परंतु समाजवादी पक्षाचा सहयोगी राष्ट्रीय लोक दल (RLD) सामील होणार नाही. त्यामागे पक्षप्रमुख जयंत चौधरी हे देशाबाहेर असल्याचे कारण सांगितले जात आहे. जयंत चौधरी लंडनमध्ये असून पक्षप्रमुखांनी बैठकीला हजेरी लावणे अपेक्षित आहे, त्यामुळे या बैठकीत आरएलडीचा एकही प्रतिनिधी नसणार आहे.

मुख्यमंत्री निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला जनता दल युनायटेडचे नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) मेहबुबा मुफ्ती, शिवसेनेचे (यूबीटी) उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी हे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

विरोधकांची मोर्चेबांधणी, काय होणार चर्चा?

विरोधकांच्या या महामंथनात 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व पक्ष एकाच व्यासपीठावर कसे येतील? यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्व पक्षांनी एकत्र आल्यास भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) पराभव होऊ शकतो, असा दावा विरोधी पक्षांचे नेते वारंवार करत आहेत.

हेही वाचा >> अजित पवारांचा राष्ट्रवादीमध्येच ‘कार्यक्रम’, शरद पवारांच्या खेळीचा अर्थ काय?

आता प्रश्न असा आहे की, नितीशकुमारांनी बोलवलेल्या या बैठकीला हजेरी लावणाऱ्या पक्षांची एवढी ताकद काय आहे की ते भाजपशी लढायचेच नाही तर पराभवही करायचे एवढ्या आत्मविश्वासाने बोलत आहेत?

हे वाचलं का?

    follow whatsapp