राज ठाकरेंनी निवडून आणलेले 13 आमदार सध्या आहेत कुठे?
२००९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मनसेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांचे तब्बल १३ आमदार निवडूण आले. ज्या पहिल्या निवडणुकीत १३ आमदार निवडूण आले होते, ते १३ आमदार सध्या कुठे आहेत, हेच आपण जाणून घेणार आहोत.
ADVERTISEMENT

Raj Thackeray 13 elected MLAs : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची गुढी पाडव्याची सभा शिवाजी पार्कवर पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. त्याचबरोबर मनसेवर होणाऱ्या टिकेचा देखील त्यांनी समाचार घेतला. मनसे हा संपलेला पक्ष आहे अशी टीका मनसेवर होत असते त्यावर गर्दीकडे बोट दाखवत हा संपलेला पक्ष आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.२००५ मध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर २००९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मनसेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांचे तब्बल १३ आमदार निवडूण आले. असं असलं तरी पुढच्या काळात पक्षाला उतरती कळा लागली. सध्या मनसेचे एकच आमदार आहेत. ज्या पहिल्या निवडणुकीत १३ आमदार निवडूण आले होते, ते १३ आमदार सध्या कुठे आहेत, हेच आपण जाणून घेणार आहोत.(where are the 13 mlas elected by raj thackeray now)
बाळा नांदगावकर: बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे राज ठाकरे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत समजले जातात. बाळा नांदगावकर यांना मनसेतून 2009 विधानसभा तिकिट देण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत त्यांचाही पराभव झालेला.
नितीन सरदेसाई: नितीन सरदेसाई हे 2009 मध्ये माहिम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. ते आजही राज ठाकरेंसोबत कायम असल्याचं पाहायला मिळतं.