उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी का मानले शरद पवारांचे आभार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुमारे ५१ आमदारांना आपल्या साथीला घेतलं. त्यानंतर ते आधी सुरत आणि मग गुवाहाटीला गेले होते. या सगळ्या सत्तानाट्याची लढाई सुप्रीम कोर्टात गेली होती. फ्लोअर टेस्टचा गुरूवारीच हा निर्णय दिला गेला. त्याआधीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरे यांनी केलेलं शेवटचं भाषण जसंच्या तसं..

या राजीनाम्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहेत. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी आभार का मानले आहेत? त्याची चर्चा होते आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

“मी शरद पवार यांचे आभार मानतो. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले. मार्गदर्शन केलं.स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजींच्या मागे ठामपणे उभे राहिले.काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली.सत्ता येते सत्ता जाते. अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही!

ADVERTISEMENT

हे ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी शरद पवारांच्या एका वक्तव्याचं ग्राफिक्सही जोडलं आहे. “आज बाळासाहेब नाहीत, ते असतं तर सगळं आलबेल झालं असतं त्यांच्या मुलावर संकट कोसळलं आहे. आधार देणं माझं कर्तव्य आहे.” हे वाक्य त्यांच्या ग्राफिक्सवर आहे.

ADVERTISEMENT

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी गेल्या अडीच वर्षात घेतलेले निर्णय थोडक्यात सांगितले त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या साक्षीने राजीनामा देतो आहे हे जाहीर केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. फेसबुकवर येत उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला. सुप्रीम कोर्टाने फ्लोअर टेस्टच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर सोशल मीडियावर लाइव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आज मी महाराष्ट्राच्या साक्षीने माझ्या पदाचा त्याग करतो आहे. शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा आनंद त्यांना खुशाल लुटू दे. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. शिवसेना भवनात आता मी पुन्हा बसायला सुरूवात करणार आहे. माझ्या माता भगिनींना घेऊन शिवसेनेची वाटचाल नव्याने करणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT