नव्या संसदेतील अशोक स्तंभामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी का ठरत आहेत टीकेचे धनी?

मुंबई तक

नव्या संसदेतल्या अशोक स्तंभाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. सोमवारी हा कार्यक्रम पार पडला. एका महाकाय अशा अशोक स्तंभाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मात्र याच अशोक स्तंभामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टीकेचे धनी ठरले आहेत. सोमवारी जेव्हा अशोक स्तंभाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नव्या संसदेतल्या अशोक स्तंभाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. सोमवारी हा कार्यक्रम पार पडला. एका महाकाय अशा अशोक स्तंभाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मात्र याच अशोक स्तंभामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टीकेचे धनी ठरले आहेत.

सोमवारी जेव्हा अशोक स्तंभाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं तेव्हा असदुद्दीन ओवेसी यांनी हे संविधानिक मापदंडांचं उल्लंघन असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप या पक्षांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे बाण चालवले आहेत. आप या पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजमुद्रा बदलली आहे असा आरोप केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी हा प्रश्नही उपस्थित केला आहे की भारताची राजमुद्रा बदलणाऱ्यांना राष्ट्रविरोधी का म्हटलं जाऊ नये?

तर दुसरीकडे तृणमूलचे खासदार जवाहर सरकार यांनीही या अशोक स्तंभावर आक्षेप घेतला आहे. पूर्वीच्या अशोक स्तंभापेक्षा नव्या अशोक स्तंभात बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या राजमुद्रेचा अपमान केला आहे. नव्या संसदेत बसवण्यात आलेला अशोक स्तंभ हे अशोक स्तंभाचं मोदी व्हर्जन आहे अशीही टीका त्यांनी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp