माझ्या शहरात जातीय दंगे भडकवणाऱ्याला सोडणार नाही – शिवसेना आमदाराचा इशारा

मुंबई तक

सध्या राज्याच्या राजकारणात हनुमान चालीसा, मशिदीवरील भोंगे असे मुद्दे चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच 1 मे रा राज ठाकरेंची औरंगाबादला होणारी सभा आणि त्यानंतर 3 मे ला मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी दिलेलं डेडलाईन यामुळे कायदा-सुव्यवस्थेत कोणतीही बाधा येणार नाही यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय. या पार्श्वभूमीवर बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मनसे आणि भाजप यांना थेट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सध्या राज्याच्या राजकारणात हनुमान चालीसा, मशिदीवरील भोंगे असे मुद्दे चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच 1 मे रा राज ठाकरेंची औरंगाबादला होणारी सभा आणि त्यानंतर 3 मे ला मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी दिलेलं डेडलाईन यामुळे कायदा-सुव्यवस्थेत कोणतीही बाधा येणार नाही यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय. या पार्श्वभूमीवर बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मनसे आणि भाजप यांना थेट इशारा दिला आहे.

राज ठाकरेंसह इतरांना भडकावून भाजप राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या शहरात जर कोणीही जातीय दंगे भडकवाण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही. मशिदीवरील भोंगे काढले तर क्रियेला प्रतिक्रीया आल्याशिवाय राहणार नाही. उद्या मुस्लीम समुदायही मंदिरावरील भोंगे हटवण्यासाठी समोर येईल. मशिदीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यावरुन सध्या बरीच चर्चा सुरु आहे पण असं केलेलं बजरंगबलीला चांगलं वाटेल का? असा प्रश्न गायकवाड यांनी विचारला आहे.

योगींच्या टकल्याला शाई लावायला अयोध्येत जाताय का? भास्कर जाधवांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल

औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंना एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी इफ्तार पार्टीचं आमंत्रण दिलं होतं. परंतू राज ठाकरे हे इफ्तार पार्टीला जाणार नाही कारण ते आग लावायला आले आहेत, विझवण्यासाठी नाहीत अशी खोचक टीका गायकवाड यांनी केली आहे.

मशिदींवरच्या भोंग्याविरोधात हनुमान चालीसाच का? राज ठाकरेंनीच दिलं उत्तर, म्हणाले….

राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी आपल्या भूमिकेवरुन थेट यु-टर्न घेतला असून मोदी आणि भाजपवर टीका करणारे राज ठाकरे आता त्यांचं गुणगान गात असल्याचा टोला गायकवाड यांनी लगावला.

औरंगाबादच्या सभेआधी राज ठाकरेंना झाली बाळासाहेबांच्या ‘त्या’ तीन सल्ल्यांची आठवण

हे वाचलं का?

    follow whatsapp