तेजस ठाकरे राजकारणात येणार का? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

जाणून घ्या काय म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांनी?
Will Tejas Thackeray enter politics? Aditya Thackeray made it clear, said
Will Tejas Thackeray enter politics? Aditya Thackeray made it clear, said

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंही शिवसेना पुन्हा वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. अशात तेजस ठाकरे हे राजकारणात येतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आज समोर आलेलं बॅनर. या बॅनरवर तेजस ठाकरेंचाही फोटो आहे. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांनी स्पष्टच उत्तर दिलं आहे.

तेजस ठाकरे राजकारणात येणार का? काय म्हणाले आदित्य ठाकरे

तेजस ठाकरे राजकारणात येणार का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं. आदित्य ठाकरे म्हणाले की, तेजस ठाकरेंविषयीच्या बातम्या कोण पेरतं माहित नाही. मात्र त्यामध्ये काही तथ्य नाही. तेजस ठाकरे हे त्यांच्या वाईल्डलाईफमध्ये बिझी आहेत. आणि आम्ही आमच्या. त्यामुळे अशा फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नका.

तेजस ठाकरे काय करतात?

भाऊ आदित्य ठाकरे आणि वडील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय नाहीत. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी तेजस ठाकरेंनी शिवसेनेचा प्रचार केला होता. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वन्य जिवांचा अभ्यास करत असताना खेकड्यांच्या अनेक प्रजातीही तेजस यांनी शोधल्या आहेत. यातल्या एका प्रजातीला ठाकरे कुटुंबीयांचं नाव देण्यात आलं आहे.

मागील वर्षी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचाही शोध लावला होता. कर्नाटकमध्ये असलेल्या सकलेशपूरच्या जंगाल उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातीच्या पाली आढळून आल्या आहेत. तेजस ठाकरे यांच्या इंस्टापेजवरही या पालींचे आणि खेकड्यांचे फोटो आहेत.

आणखी काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी?

वांद्रे-अंधेरी सी लिंकचं काम हे मुंबईत सुरू आहे, पण या कामासंबंधी मुलाखती मात्र चेन्नईमध्ये घेतल्या जात आहेत, त्यामुळे भूमीपुत्रांचं काय असा सवाल शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा विकास कामांवर लक्ष द्यायला हवं अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, "आज मी कोणत्याही राजकीय विषयावर बोलणार नाही. महाराष्ट्राच्या दृष्टीने आज रोजगार आणि विकासाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. वांद्रे- अंधेरी सी लिंकचा प्रकल्प हा मुंबईमध्ये होणार आहे.पण त्यासाठी येत्या रविवारी चेन्नईमध्ये मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे भूमीपुत्रांच्या हक्काचं काय असा प्रश्न निर्माण होतोय. मला चेन्नई किंवा गुजरातवर आक्षेप नाही, पण काम जर मुंबईत असेल तर मग केवळ चेन्नईमध्ये मुलाखती का? त्याचसोबत मुंबई, ठाणे, संभाजीनगर या सारख्या शहरातही मुलाखती व्हाव्यात." अशीही मागणी त्यांनी केली

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in