धक्कादायक ! वयाच्या २९ व्या वर्षी भारतीय क्रिकेटपटूचं निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या सौराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या अवि बारोटचं वयाच्या २९ व्या वर्षी निधन झालं आहे. cardiac arrest मुळे अवि बारोटचं निधन झाल्याची माहिती सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दिली आहे.

यंदाच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळत असताना अवि बारोटने शतक झळकावलं होतं. तसेच २०१९-२० च्या रणजी करंडक विजेत्या सौराष्ट्र संघाचाही तो सदस्य होता. यष्टीरक्षक-फलंदाज अशी अवि बारोटची ओळख होती. काही दिवसांपूर्वीच त्याने आपले सराव करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. त्याच्या निधनामुळे क्रिकेट जगतासह फॅन्सनीही हळहळ व्यक्त केली आहे.

आपल्या कारकिर्दीत अवि बारोटने ३८ प्रथम श्रेणी सामने, ३८ लिस्ट ए सामने आणि २० स्थानिक टी-२० सामने खेळले. बरोटने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एक शतक आणि नऊ अर्धशतकांच्या मदतीने १५४७ धावा केल्या होत्या. लिस्ट ए सामन्यांमध्ये ८ अर्धशतकांच्या मदतीने १०३० धावा केल्या गेल्या. बरोट टी-२० क्रिकेटचा स्फोटक खेळाडू होता. त्याने देशांतर्गत टी-२० मध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने ७१७ धावा केल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

२०१५-१६मध्ये सौराष्ट्राला मुंबईने आणि २०१८-१९मध्ये अंतिम सामन्यात विदर्भाला पराभूत केले होते. दोन्ही वेळा अवि या संघाचा भाग होता. २०१०-११ कूचबिहार करंडकात गुजरातसाठी चार शतके आणि तीन अर्धशतके ठोकल्याबद्दल बरोटला बीसीसीआयने अंडर-१९ क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कारही दिला होता. २०२०-२१च्या हंगामात, बरोटने सौराष्ट्रसाठी विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक करंडक स्पर्धेत भाग घेतला. त्याने गोव्याविरुद्ध टी-२० क्रिकेटचे एकमेव शतकही झळकावले. या सामन्यात, बरोटने फक्त ५३ चेंडूत १२२ धावा केल्या होत्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT