IND vs ENG :दिग्गज फेल, मधल्या फळीनं सावरलं; 15 वर्षानंतर मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगलं

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (Team India) दारुण पराभव झाला, Joe Root तसंच Jonny Bairstow यांची खेळी सरस
After 15 years India's dream of winning the series was shattered IND vs ENG
After 15 years India's dream of winning the series was shattered IND vs ENG@BCCI

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. इंग्लंडने चौथ्या डावात 378 विक्रमी धावांचा पाठलाग करत विजय नोंदवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. तब्बल 15 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले आहे.

इंग्लंडने 378 धावांचा पाठलाग करताना जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी अप्रतिम खेळी खेळली. दोघांनी जबरदस्त शतक झळकावले आणि शेवटच्या दिवशी विजयासाठी आवश्यक असलेल्या 7 विकेट्समध्ये टीम इंडियाला एकही यश मिळू दिले नाही. जो रूटने 142 आणि जॉनी बेअरस्टोने 114 धावा केल्या.

दोन्ही धडाकेबाज खेळींच्या जोरावर इंग्लंडने केवळ 77 षटकांत 378 धावांचे लक्ष्य गाठले. भारताने प्रतिस्पर्धी संघाला 350 हून अधिक धावांचे लक्ष्य देण्याची ही पहिलीच वेळ होती आणि त्यानंतरही हा सामना भारताने गमावला आहे.

जॉनी बेअरस्टोने टीम इंडियाची लय बिघडवली

पहिल्या डावात इंग्लंडने 284 धावा केल्या आणि त्यावेळी इंग्लंडवरती 132 धावांनी आघाडी होती. पण या पहिल्या डावातही जॉनी बेअरस्टो इंग्लंडसाठी स्टार ठरला. जॉनी बेअरस्टोची विराट कोहलीसोबत मैदानात वाद झाला आणि, त्याचा खेळ बदलला. यानंतर त्याने पहिल्या डावात शतक झळकावले, तर बेअरस्टोने दुसऱ्या डावातही शतक झळकावले.

After 15 years India's dream of winning the series was shattered IND vs ENG
Virat Kohli: विराट कोहलीला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आलीये का?

दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी आपला खेळ बदलला. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने पहिली शतकी भागीदारी केली. यानंतर जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात जबरदस्त भागीदारी झाली. माजी कर्णधार जो रूटनेही आपल्या कारकिर्दीतील 28वे शतक झळकावले.

दिग्गज अपयशी ठरले, मधल्या फळीने सावरले

टीम इंडियाने पहिल्या डावात 416 धावांची मोठी धावसंख्या उभारली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली तेव्हा सुरुवात खराब झाली होती. टीम इंडियाने 100 धावांच्या आतच आपल्या पाच विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्यात 200 हून अधिक धावांची भागीदारी झाली त्यामुळे भारताचा डाव सावरला. पहिल्या डावात ऋषभ पंतने 146, रवींद्र जडेजाने 104 धावा केल्या.

दुसऱ्या डावाबद्दल बोलायचे झाले तर, पुन्हा एकदा टॉप ऑर्डर अपयशी ठरली. केवळ चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतके ठोकली, ज्याच्या जोरावर टीम इंडियाची धावसंख्या 245 धावांपर्यंत पोहोचली. तिसऱ्या दिवशी चांगली आघाडी घेतल्यानंतर चौथ्या दिवशी टीम इंडियाने अवघ्या 120 धावांच्या फरकाने आपले सात विकेट गमावले, जे भारतासाठी जड गेले.

* पहिली कसोटी – नॉटिंगहॅम – अनिर्णित

* दुसरी कसोटी – लॉर्ड्स – भारत 151 धावांनी जिंकला

* तिसरी कसोटी – लीड्स – इंग्लंड एक डाव आणि 76 धावांनी जिंकला

* चौथी कसोटी – ओव्हल, भारत 157 धावांनी जिंकला

* पाचवी कसोटी – एजबॅस्टन, भारताचा 7 विकेट्सनी पराभव झाला

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in