PCB ला आणखी एक धक्का, न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडच्या संघाचाही पाकिस्तानात येण्यास नकार

मुंबई तक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणखी एक धक्का बसलेला आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडच्या संघाने सुरक्षेचं कारण देऊन पाकिस्तान दौरा रद्द केला होता. सामना सुरु होण्याआधी अर्धा तास बाकी असताना हा दौरा रद्द झाल्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाचं मोठं नुकसान झालं. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही आपला नियोजीत पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. इंग्लंडचा क्रिकेट संघ ऑक्टोबर महिन्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणखी एक धक्का बसलेला आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडच्या संघाने सुरक्षेचं कारण देऊन पाकिस्तान दौरा रद्द केला होता. सामना सुरु होण्याआधी अर्धा तास बाकी असताना हा दौरा रद्द झाल्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाचं मोठं नुकसान झालं. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही आपला नियोजीत पाकिस्तान दौरा रद्द केला आहे.

इंग्लंडचा क्रिकेट संघ ऑक्टोबर महिन्यात टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानात येणार होता. याचदरम्यान इंग्लंडच्या महिला संघाचेही सामने यावेळी होणार होते. परंतू त्याआधीच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपण दौऱ्यातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

‘खेळाडूंवर तणाव नको, म्हणून दौरा रद्द’ – इंग्लंड क्रिकेट बोर्ड

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटलं आहे की, “आमच्यासाठी खेळाडूं आणि सपोर्ट स्टाफचं मानसिक आणि शाररिक आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही प्रकारचा प्रवास धोक्याचाच आहे. त्यात त्या भागात दौऱ्यासाठी जाण्याने खेळाडूंवर ताण वाढेल. त्यात कोरोनासंबधी नियम आणि एकंदरीत तणावामुळे आगामी टी-20 विश्वचषकासाठी आमच्या टी-20 संघावरही याचा परिणाम होईल. या सर्व कारणांमुळे आम्ही हा निर्णय़ घेत आहोत.”

हे वाचलं का?

    follow whatsapp