INDvsNZ Tests: कोहलीबरोबर रोहित शर्मालाही विश्रांती; कसोटी संघाचं नेतृत्व मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे

मुंबई तक

India squad Tests against New Zealand: मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) कसोटी मालिकेसाठी (Test Series) आज (12 नोव्हेंबर) भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याची घोषणा केली आहे. यावेळी पहिल्या सामन्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचसोबत टी-20 चा कर्णधार रोहित शर्मा याला संपूर्ण कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

India squad Tests against New Zealand: मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) कसोटी मालिकेसाठी (Test Series) आज (12 नोव्हेंबर) भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याची घोषणा केली आहे. यावेळी पहिल्या सामन्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचसोबत टी-20 चा कर्णधार रोहित शर्मा याला संपूर्ण कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी नेतृत्व मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) सोपविण्यात आलं आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर: अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेट कीपर), केएस भारत (विकेट कीपर), रवींद्र जाडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांची संघात निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, विराट कोहली हा दुसऱ्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघात असणार आहे. त्यामुळे त्या सामन्यापासून कर्णधारपदाची सूत्र त्यांच्याकडे असणार आहेत.

2 टेस्ट आणि 3 टी-20 सामने

हे वाचलं का?

    follow whatsapp