दोन वेळा दुखापत, बांबूच्या साहाय्याने सराव अन् सुवर्ण पदक, असा होता जेरेमी लालरिनुंगाचा प्रवास

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022), जेरेमी लालरिनुंगाने (Jeremy Lalrinnunga) पुरुषांच्या वेटलिफ्टिंगच्या 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. जेरेमी लालरिनुंगाने स्नॅचमध्ये विक्रमी 140 किलो वजन उचलले, तर क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलण्यात त्याला यश आले. म्हणजेच त्याने रेकॉर्ड करत एकूण 300 किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले आहे. सामन्यादरम्यान, क्लीन आणि जर्क राऊंडमध्ये जेरेमी लालरिनुंगाला दोन वेळा दुखापत झाली पण त्याने हार मानली नाही.

19 वर्षीय जेरेमीचा 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मूळचा मिझोरामचा असलेल्या जेरेमीने वडिलांना पाहून बॉक्सिंगला सुरुवात केली, पण नंतर त्याने वेटलिफ्टिंगला करिअर म्हणून निवडले. जेरेमीचे वडील एक सुप्रसिद्ध बॉक्सर आहेत, परंतु त्यांनी नंतर आठ जणांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पीडब्ल्यूडी विभागात नोकरी स्वीकारली.

सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न आधीच ठरवले

19 वर्षीय जेरेमी लालरिनुंगा याने काही महिन्यांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे ठरवले होते. या वर्षी मे महिन्यात जेरेमी लालरिनुंगाने त्याच्या फोनच्या वॉलपेपरवर कॉमनवेल्थ गेम्सच्या सुवर्णपदकाचा फोटो ठेवला होता. आता जेरेमी लालरिनुंगाने खरोखरच सुवर्णपदक पटकावले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वयाच्या सहाव्या वर्षीपासून बॉक्सिंगला सुरुवात

सुवर्ण पदक जिंकल्यानंतर जेरेमी म्हणाला, ‘मी सहा वर्षांचा असताना माझ्या वडिलांसोबत बॉक्सर म्हणून माझा प्रवास सुरू केला. माझे वडील लालमैथुआवा हे 90 च्या दशकाच्या सुरुवातीस आयझॉलमधील बॉक्सिंग सर्किटमधील एक प्रसिद्ध चेहरा होते. आपल्या समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर स्थान निर्माण केले आणि अनेक पदकं जिंकली. परंतु आर्थिक अडचणींमुळे त्यांना स्थानिक विद्युत बांधकाम विभागात (PWD) काम करावे लागले. माझ्या वडिल बॉक्सिंग शिकवण्यासाठी नेहमीच खूप उत्सुकता होते आणि म्हणूनच मी लहानपणापासून त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत असे.

जिममधील मुलांना पाहून मिळाली प्रेरणा

तो पुढे म्हणाला, ‘जेव्हा मी बॉक्सिंग करत होतो, तेव्हा मी माझ्या घराजवळच्या जिममध्ये मुलं ट्रेनिंग करताना पाहायचो. ते भरपूर वजन उचलत असत आणि त्याने मला प्रेरणा मिळत असे. यामुळे मला वेटलिफ्टिंगमध्ये करीयर करण्याची प्रेरणा मिळाली. मी जिममधील मुलांशी संपर्क साधला आणि त्यांना विचारले की ते मला वजन कसं उचलायचं हे शिकवणार का? मी ते करु लागलो आणि वजन उचलण्यात यशस्वी झालो.

ADVERTISEMENT

बांबूच्या साहाय्याने करायचा सराव

जेरेमी म्हणाला, ‘मी माझ्या गावातील एसओएस अकादमीमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये माझ्या करिअरची सुरुवात केली. तिथे प्रशिक्षक मला बांबू आणायला सांगायचे आणि हळू हळू उचलायला सांगायचे. ते 5 मीटर लांब आणि 20 मिमी रुंद होते. त्याच्यावर कोणतेही वजन नसायचे, परंतु वजनाच्या तुलनेत काठी उचलणे खरोखर कठीण असते कारण आपल्याला ते बॅलन्स कसे करायचे हे माहित असणे आवश्यक आहे. मी रात्रंदिवस सराव केला, बांबूच्या काठ्या उचलून बॅलन्स साधण्याची कला आत्मसात केली. बॅलन्सिंग ऍक्ट शिकल्यानंतर मला वजन उचलण्यास सांगण्यात आले. माझ्या वेटलिफ्टिंग करिअरची सुरुवात अशा प्रकारे झाली.

ADVERTISEMENT

जेरेमीच्या नावावर अनेक विक्रम

जेरेमीने 2018 च्या उन्हाळी युवा ऑलिम्पिकमध्ये मुलांच्या 62 किलो वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. यासह जेरेमी युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. त्यानंतर जेरेमीने आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले. जेरेमी लालरिनुंगाने गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमधील पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT