Dinesh Kartik
Dinesh Kartik@BCCI

ऋषभ पंतचे दुधाचे दात अन् दिनेश कार्तिककचे पदार्पण; नक्की काय आहे कनेक्शन?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 32 टी-20 सामने खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने 399 धावा केल्या आहेत.

वर्ष होते 2004 आणि मैदान होते इंग्लंडचे लॉर्ड्स. दिनेश कार्तिकचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास इथून सुरू झाला. त्याने एकदिवसीय क्रिकेटपासून आपल्या करियरची सुरुवात केली. हा सामना लॉर्ड्सवर असल्याने प्रतिस्पर्धी संघ इंग्लंड होता. म्हणजेच त्यांने आपला पदार्पणचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात कार्तिकने फक्त 1 धाव काढली होती. मात्र हा सामना टीम इंडिया जिंकली होती. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिनेश कार्तिकसोबत हे सर्व घडत असताना ऋषभ पंत काय करत होता? तेव्हा तो खूप लहान होता.

तेव्हा ऋषभ पंत फक्त 7 वर्षांचा होता, म्हणजेच त्याला तेव्हा क्रिकेटचा सी देखील माहित नव्हता. येथे दिनेश कार्तिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. पण, क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणण्यामागे हे देखील एक कारण आहे. बघा काळाचं गणित कसं असते की कार्तिक अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय आणि आता तोच ७ वर्षांचा मुलगा, जो आता मोठा झालाय, नाव आणि ओळख निर्माण करतोय, तोच त्याचा कर्णधार असणार आहे.

दिनेश कार्तिक आता पंतच्या नेतृत्वाखाली खेळणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 32 टी-20 सामने खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने 399 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 143 पेक्षा जास्त होता. नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2022 मध्ये, ज्या प्रकारे तो आरसीबीसाठी सामने खेळताना दिसला, त्यातलं क्रिकेट अजून किती शिल्लक आहे हे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंतला त्याचा हाच अवतार पाहायला आवडेल.

ऋषभ पंत - दिनेश कार्तिक महान बनण्याची चिन्हे

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिनेश कार्तिकने ऋषभ पंतचे जोरदार कौतुक केले. महान खेळाडू होण्याचे गुण त्याच्यात आहेत तो चांगला कर्णधार बनू शकतो. दिनेश कार्तिक म्हणाला होता, “पंत महान खेळाडू बनण्याच्या मार्गावर आहे. जर तो टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आणि त्यात विकेटकीपिंग केले तर धोनीप्रमाणे तोही एक महान यष्टिरक्षक फलंदाज बनू शकतो.''

केएल राहुलच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाची कमान ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in