Shane Warne Death: धक्कादायक.. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नचं वयाच्या 52व्या वर्षी निधन

मुंबई तक

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त काही वेळापूर्वीच हाती आलं आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. निधनसमयी शेन वॉर्न हा थायलंडमध्ये होता. मिळालेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्येच होता जिथे तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. शेन वॉर्नच्या मॅनेजमेंटने जारी केलेल्या एका निवेदनात त्याचा मृत्यू थायलंडमधील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त काही वेळापूर्वीच हाती आलं आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. निधनसमयी शेन वॉर्न हा थायलंडमध्ये होता. मिळालेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्येच होता जिथे तो बेशुद्धावस्थेत आढळून आला.

शेन वॉर्नच्या मॅनेजमेंटने जारी केलेल्या एका निवेदनात त्याचा मृत्यू थायलंडमधील कोह सामुई येथे झाल्याचे म्हटले आहे. ‘शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, त्याला पुन्हा जिवंत करता आले नाही,’ असे निवेदनात म्हटले आहे.

‘त्याचे कुटुंब यावेळी गोपनीयतेची विनंती करत आहे आणि योग्य वेळी अधिक तपशील प्रदान केला जाईल,” असंही शेन वॉर्नच्या मॅनेजमेंटने एका निवेदनात म्हटले आहे. गुरुवारीच शेन वॉर्नने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर थायलंडमधील त्याच्या व्हिलाचा फोटो शेअर केला होता.

शेन वॉर्न हा त्यांच्या जादूई फिरकीसाठी क्रिकेट विश्वात ओळखला जायचा 1993 च्या अॅशेस दरम्यान मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत शेन वॉर्नने इंग्लंडच्या माईक गेटिंगला ज्या चेंडूवर बोल्ड केलं होतं तो चेंडू क्रिकेटच्या इतिहासातील ‘सर्वोत्तम चेंडू’ असल्याचे आजही म्हटले जाते. त्या एका चेंडूने वॉर्नचे अवघं आयुष्यच बदलून टाकलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp