गांगुलीने चित्र स्पष्ट करावं ! Virat Kohli सोबतच्या वादावर सुनील गावसकरांचं मत
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी सध्या गाजत असलेल्या विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय वादावर आपलं परखड मत मांडलं आहे. सौरव गांगुलीने या वादावर आपलं मत देऊन चित्र स्पष्ट करावं असं गावसकर म्हणाले. विराट कोहलीने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुलीने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण कोहलीला कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगितलं होतं. परंतू आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधी विराटने […]
ADVERTISEMENT

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी सध्या गाजत असलेल्या विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय वादावर आपलं परखड मत मांडलं आहे. सौरव गांगुलीने या वादावर आपलं मत देऊन चित्र स्पष्ट करावं असं गावसकर म्हणाले.
विराट कोहलीने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुलीने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण कोहलीला कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगितलं होतं. परंतू आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधी विराटने आपल्याला कॅप्टन्सी न सोडण्याबद्दल कोणीही काहीही बोललेलं नसल्याचं सांगितलं.
‘कोणाकडेही बोट दाखवणं चांगलं नाही’, Virat Kohli च्या पत्रकार परिषदेतील भूमिकेवर कपिल देव नाराज
माझ्या मते कोहलीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर बीसीसीआयची बाजू काय आहे हे पुढे आलं नाहीये. माझ्या मते सौरव गांगुलीलाच याबद्दल विचारावं लागेल. तो बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. विराटच्या राजीनाम्याबद्दल झालेल्या वक्तव्य आणि स्पष्टीकरणांमध्ये एवढी विसंगती का आहे? त्यामुळे या प्रश्नाबद्दल सौरव गांगुलीच योग्य माहिती देऊ शकतो”, गावसकर इंडिया टुडेशी बोलत होते.
२०२१ वर्ष ठरलंय Virat साठी अत्यंत खडतर ! या ८ गोष्टी गमावल्या
निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शेवटी मला वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात येत असल्याचं कळलं असं विराट कोहलीने स्पष्ट केलं. याबद्दल बोलताना गावसकर यांनी मग यात बिघडलं तरी कुठे असा प्रश्न विचारला आहे. जोपर्यंत निवड समितीचे अध्यक्ष विराटला आम्ही तुझा कर्णधारपदासाठी विचार करत नाही आहोत असं सांगत आहेत हे योग्यच आहे. निवड समितीच्या मिटींगमध्ये सर्व अधिकार हे समितीकडेच असतात. कर्णधाराकडे या बैठकीत कोणतंही मत नसतं, त्याच्याशी फक्त सल्लामसलत केली जाते. जर विराटला ही बातमी मीडियामधून किंवा इतर ठिकाणाहून कळली असती तर याबद्दल आक्षेप घेता आला असता. परंतू निवड समितीने विराटला सांगितलेला निर्णय हा योग्यच होता आणि यात वाद घालण्यासारखं काहीच नाही असंही गावसकर म्हणाले.
अशा परिस्थितीत निवड समिती सदस्य आणि कर्णधार यांच्यामध्ये संवाद असायला हवा, जेणेकरुन असा संभ्रम निर्माण होत नाही. संघ निवड झाल्यानंतर अध्यक्षांनी पत्रकारांशी संवाद साधून खेळाडूला का निवडलं याचं कारण द्यावं. तसं होणार नसेल एक प्रेस रिलीज काढून त्यात सर्व माहिती द्यावी असाही सल्ला गावसकर यांनी दिला आहे.
Virat ने काढली गांगुलीची विकेट, म्हणाला ‘टी-२० ची कॅप्टन्सी सोडू नको असं कोणीही सांगितलं नाही’