T20 World Cup : …तर बीसीसीआयला आत्मपरीक्षण करण्याची गरज – कपिल देव यांचा सल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टी-२० विश्वचषकात पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे सर्व चाहते निराश झाले आहेत. अनेक माजी खेळाडूंनीही भारतीय संघाच्या कामगिरी आणि रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे.

जर संघातले मोठे खेळाडू अपेक्षेप्रमाणे खेळ करत नसतील तर आता नवोदीत खेळाडूंना संधी द्यायला हवी असं मत कपिल देव यांनी व्यक्त केलं आहे. “जर आपण इतर संघाच्या खराब कामगिरीच्या जोरावर यशस्वी होऊन सेमी फायनलला पोहचलो तर भारतीय क्रिकेटसाठी ही चांगली गोष्ट ठरणार नाही. जर तुम्हाला वर्ल्डकप जिंकायचा आहे किंवा सेमी फायनलला पोहचायचं आहे तर तुम्ही स्वतःच्या बळावर पोहचा. इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहणं योग्य ठरणार नाही. माझ्या मते निवड समितीला आता संघातील मोठ्या नावांबद्दल विचार करायची वेळ आलेली आहे.” कपिल देव ABP News शी बोलत होते.

T20 World Cup : भारताच्या कामगिरीसाठी IPL ला दोष देणं योग्य ठरणार नाही – गौतम गंभीर

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि सध्याच्या संघातील खेळाडूंच्या तुलनेत ते ताजेतवानेही होते. त्या खेळाडूंचा विचार होऊ शकला असता असंही कपिल देव यांनी सांगितलं. “जे तरुण खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतायत त्यांना आता संधी देण्याची वेळ आली आहे का याचा विचार बीसीसीआयला करावा लागणार आहे. तुम्ही पुढच्या पिढीला मजबूत कसं बनवणार आहात? ते हरले तरीही काही हरकत नाही, त्यांना अनुभव येईल. परंतू जर भारतीय संघातले मोठे खेळाडू अपेक्षेप्रमाणे खेळत नसतील तर त्यांच्यावर टीका ही होणारच आहे. बीसीसीआयने याबद्दल आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.”

सलग दोन पराभवांमुळे भारताचं स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं आहे. सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताला उर्वरित तिन्ही सामन्यांत मोठा विजय मिळवून इतर संघाच्या निकालावर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

ADVERTISEMENT

BLOG : शेवट गोड व्हावा असं विराटलाच वाटत नसावं !

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT