Ind vs NZ : वानखेडे मैदानावर १० विकेट घेणारा Ajaz Patel आहे मुंबईकर, जाणून घ्या त्याच्याविषयी

मुंबई तक

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना गाजवला तो न्यूझीलंडच्या ऐजाज पटेलने. पहिल्या डावात एजाजने १० विकेट घेत जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. एजाजच्या माऱ्यासमोर टीम इंडियाचा पहिला डाल ३२५ धावांवर संपुष्टात आला. या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून एजाज पटेलचं कौतुक होत आहे. वानखेडे मैदान गाजवणारा एजाज हा मुळचा मुंबईकरच आहे. त्यामुळे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना गाजवला तो न्यूझीलंडच्या ऐजाज पटेलने. पहिल्या डावात एजाजने १० विकेट घेत जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. एजाजच्या माऱ्यासमोर टीम इंडियाचा पहिला डाल ३२५ धावांवर संपुष्टात आला. या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून एजाज पटेलचं कौतुक होत आहे.

वानखेडे मैदान गाजवणारा एजाज हा मुळचा मुंबईकरच आहे. त्यामुळे एका अर्थाने आपल्या होम ग्राऊंडवर खेळत असतानाच एजाजने कसोटी क्रिकेटमध्ये हा भीमपराक्रम केला आहे.

२१ ऑक्टोबर १९८८ रोजी एजाज पटेलचा मुंबईत जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी एजाज आपल्या परिवारासोबत न्यूझीलंडला स्थायिक झाला. ३३ वर्षीय एजाज पटेलने २०१८ साली न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याआधी एजाज न्यूझीलंडकडून स्थानिक क्रिकेट खेळत होता. २०१८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामन्यात एजाजला न्यूझीलंड संघात स्थान मिळालं.

Ind vs NZ : एजाज पटेलचा मुंबईत विक्रम, एकाच डावात १० बळी घेत दिग्गज बॉलर्सच्या पंगतीत स्थान

हे वाचलं का?

    follow whatsapp