Ind vs Pak : 36 धावांत झाला ‘गेम’! 31 वर्षांनंतरही पाकचं ‘ते’ स्वप्न अधुरेच
ICC विश्वचषक 2023 मध्ये (World Cup 2023) कर्णधार रोहित शर्माच्या झंझावाती खेळीमुळे टीम इंडियाने एका शानदार सामन्यात पाकिस्तानचा (India vs Pakistan) 7 गडी राखून पराभव केला.
ADVERTISEMENT

India vs Pakistan World Cup 2003 : रोहित शर्माच्या (८६ धावा) झंझावाती खेळी… त्याआधी भारतीय गोलंदाजांनी केलेला भेदक मारा… अशा दुहेरी कामगिरीमुळे टीम इंडियाने (Ind vs Pak) विश्वचषक २०२३ स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात सामन्यात पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबर टीम इंडियाने विश्वचषक 2023 मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली. भारताने पाकिस्तानपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला पराभूत केले आहे. (India defeated Pakistan by 7 wickets in the great match of the World Cup 2023)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुमारे 90 हजार क्रिकेट प्रेमींच्या उपस्थितीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या या पाच भारतीय गोलंदाज (प्रत्येकी दोन बळी) पाकिस्तानवर तुटून पडले. त्यामुळे पाकिस्तान संघाच्या 8 विकेट अवघ्या 36 धावांतच गेल्या. पाकिस्तानचा अवघा संघ 191 धावांत ऑलआऊट झाला.
दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने दिल्लीत शतक झळकावल्यानंतर अहमदाबादमध्येही तुफानी शैलीतील खेळी कायम ठेवली. रोहितने फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाईच केली. रोहितने 86 धावांच्या खेळीत 6 षटकार ठोकले. त्यामुळे भारताने 30.3 षटकांत 3 गडी गमावून 192 धावांचे लक्ष्य गाठले आणि पाकिस्तानचा सहज पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत भारताला पराभूत करण्याचे स्वप्न पाकिस्तानचे पुन्हा एकदा अधुरेच राहिले. 1992 पासून विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत करण्याची परंपरा टीम इंडियाने कायम ठेवत हा विक्रम 8-0 असा वाढवला.
हेही वाचा >> Ind vs Pak : बुमराह-कुलदीपने 12 चेंडूतच मोडलं पाकिस्तानचं कंबरडे! पाहा VIDEO
192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी शुभमन गिल रोहित शर्मासह सलामीला आला. गिलने सुरुवातीच्या क्षणांमध्ये उत्कृष्ट चौकार मारले, पण तो खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकला नाही. डावाच्या तिसऱ्या षटकात शाहीनच्या चेंडूवर गिलने पॉईंटच्या दिशेने जोरदार फटका मारला. मात्र शादाब खानने उत्कृष्ट झेल घेतला. त्यामुळे गिलला विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात 11 चेंडूत चार चौकारांसह केवळ 16 धावा करता आल्या.