Team India Squad: अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, अजिंक्य रहाणेने गमावलं उपकर्णधारपद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

India Vs South Africa, Team India Squad: बीसीसीआयने दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. तूर्तास तरी कसोटीचं कर्णधार पद हे विराट कोहलीकडेच असणार आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माची वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधारही करण्यात आले आहे. याचाच अर्थ खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या अजिंक्य रहाणेचं उपकर्णधारपद कसोटीत हिसकावण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कसोटी संघ:

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विराट कोहलीने गमावलं वनडेचं कर्णधारपद

बऱ्याच दिवसांपासून जे अंदाज बांधले जात होते ते अखेर खरे ठरले आहे. विराट कोहली आता फक्त कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-20 विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅटची जबाबदारी स्वीकारणारा रोहित शर्मा आता वनडे संघाचा कर्णधार बनला आहे. म्हणजेच आता टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2023 साली होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी सज्ज असेल.

ADVERTISEMENT

राहुल चहर, शुभमन गिल, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात सहभागी झालेले नाहीत. तर नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जन नगवासवाला यांना स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन कसोटी सामने, तीन वनडे सामने खेळणार आहे. सध्या फक्त कसोटी संघ जाहीर झाला आहे. तर वनडे संघ हा नंतर जाहीर केला जाईल.

  • पहिली कसोटी: डिसेंबर 26-30, 2021, सेंच्युरियन

  • दुसरी कसोटी: 3-7 जानेवारी 2022 जोहान्सबर्ग

  • तिसरी कसोटी: 11-15 जानेवारी 2022, केपटाऊन

Rohit Sharma ODI Captain: टी-20 नंतर वनडेचं कॅप्टन पदही रोहित शर्माकडे, कोहलीला आणखी एक धक्का

टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीने टी-20 टीमचं कॅप्टन पद सोडलं होतं. तसंच आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर बोर्ड विराट कोहलीच्या जागी वनडे कर्णधार म्हणून दुसऱ्या एखाद्या खेळाडूची नियुक्ती करू शकते अशी अटकळ सुरू होती. ज्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या T20 मालिकेत कर्णधारपद स्वीकारलं होतं. आता दक्षिण आफ्रिकेत खेळली जाणारी वनडे मालिकेपासून तो पूर्णवेळ वनडे कर्णधार म्हणून रोहित शर्माची पहिलीच मालिका असणार आहे.

रोहित शर्माने आतापर्यंत 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने 8 सामने जिंकले आहेत तर 2 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2018 मध्ये UAE मध्ये खेळलेल्या आशिया चषकाचं जेतेपदही पटकावलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT